‘मांजा’, ‘व्हेंटिलेटर’ अशा चित्रपटातून आणि ‘अशोका सम्राट’ या हिंदी मालिकेतून आपले अभिनय कौशल्य दाखवणारा अभिनेता सुमेध मुद्गलकर याने त्याच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुमेधचे चाहते त्याच्यावर भलतेच फिदा झाले आहेत. त्याचं कारण म्हणजे नुकतंच त्याने जिममध्ये कसरत करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचा जिममधला हा फोटो पाहून चाहते त्याच्यावर भलतेच फिदा झाले आहेत. सुमेधचं हे हॉट डुड ट्रान्सफॉर्मेशन युवकांमध्ये फारच प्रेरणादायक आहे.

वाचा : ‘या’ गोष्टी वाचून खिल्जी साकारणाऱ्या रणवीरबद्दलचा आदर आणखीनच वाढेल

drishyam-hollywood-remake
‘दृश्यम’बद्दल मोठी अपडेट समोर; कोरीअन रिमेकनंतर आता चित्रपटाचा बनणार आता हॉलिवूडमध्ये रिमेक
randeep hooda swatantrya veer movie clip video features on times square
रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचा व्हिडिओ झळकला न्यूयॉर्क ‘टाईम्स स्क्वेअर’ वर
do-you-know-who-is-this actress
फोटोमध्ये पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? मराठीबरोबर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही कमावतेय नाव
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…

नवीन वर्षातील सुमेधचं हे ‘फिटनेस रेसोल्युशन’ प्रेक्षकांना नक्कीच आवडलं असणार. दरम्यान, तो पुन्हा एकदा चाहत्यांच्या ‘बकेट लिस्ट’मधील इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे. २०१७ मध्ये आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीमुळे सुमेध नेहमीच चर्चेत राहिला. झी टॉकीज प्रस्तुत ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ आणि ‘रेडिओ सिटी सिने अवॉर्ड्स’ या दोन्ही पुरस्कार सोहळ्यांमध्ये सुमेधने वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकन पटकावली. तसेच या आधी ‘डान्स महाराष्ट्र डान्स’, ‘डान्स इंडिया डान्स सिझन ४’, ‘दिल दोस्ती डान्स’ आणि ‘सम्राट अशोका’ यांसारख्या मालिका आणि रिअॅलिटी शोमधून अभिनेता सुमेध मुद्गलकर हा घराघरात पोहोचला.

वाचा : पद्मावतीच्या सौंदर्याला खिल्जीच्या पत्नीने दिली टक्कर

प्रत्येक वेळीस एखादी वेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न अभिनेता सुमेध मुद्गलकर करत असतो. त्याच्या याच अनोख्या अंदाजामुळे हा नवोदित आणि तरुण अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो म्हणजे माधुरी दीक्षित – नेने स्टारर ‘बकेट लिस्ट’ ह्या चित्रपटामुळे. काही महिन्यांपूर्वी सुमेधने माधुरी दीक्षित सोबतच फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यामुळे सुमेध आता कोणत्या नवीन भूमिकेमध्ये असणार यासाठी त्याचा चाहता वर्ग वाट बघतोय.