धनुष हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या अनोख्या अभिनय शैलीसाठी ओळखला जाणारा धनुष सध्या ‘राउडी बेबी’ या गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. या गाण्यात तो अभिनेत्री साई पल्लवीसोबत डान्स करताना दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या गाण्याला युट्यूबवर तब्बल १०० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
अवश्य पाहा – ‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? दिग्दर्शकाने सांगितला अजब किस्सा
अवश्य पाहा – ‘ढिल्या कपड्यांमुळे मारली होती थोबाडीत’; करिश्माने घटस्फोटित पतीवर केला आरोप
“काय अजब योगायोग आहे. राउडी बेबी या गाण्याला १०० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. अन् याच दिवशी ९ वर्षांपूर्वी माझ्या वाय धिस कोलावरडी या गाण्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. हे पहिलं दाक्षिणात्य गाणं आहे ज्याला युट्यूबवर १०० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. या उपलब्धीसाठी सर्व चाहत्यांचे मनापासून आभार.” अशा आशयाचं ट्विट करुन धनुषनं सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
What a sweet coincidence this is Rowdy baby hits 1 billion views on same day of the 9th anniversary of Kolaveri di. We are honoured that this is the first South Indian song to reach 1 billion views. Our whole team thanks you from the heart
— Dhanush (@dhanushkraja) November 16, 2020
अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा ग्लॅमरस अवतार; अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूटमुळे चाहते आवाक्
Thank you all for owning Rowdy baby 1 Billion love and counting
— Sai Pallavi (@Sai_Pallavi92) November 16, 2020
‘राउडी बेबी’ हे गाणं ‘मारी २’ या चित्रपटातील आहे. युवन शंकर राजा याने या गाण्याला म्यूझिक दिलं आहे. या गाण्याचे बोल स्वत: धनुषने लिहिले आहेत. या गाण्यात धनुष आणि साई पल्लवीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. साईने देखील ट्विट करुन सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2020 6:44 pm