25 February 2021

News Flash

ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची ‘ग्रेटभेट’

भाजपा प्रवक्त्या शायना एन.सी. यांची देखील खास उपस्थिती लाभली.

नावापुरतीच नाजूक आणि शरीराने अगडबम असलेल्या, ‘नाजुका’च्या दमदार पुनरागमनाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. सुपरहिट ‘अगडबम’ च्या सिक्वेलमधून ती पुन्हा येत आहे. नुकतच या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए. आर. रेहमान यांनी उपस्थिती दर्शविली होती.

यावेळी ‘माझा अगडबम’ चित्रपटातील आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं ‘हळुवारा हलके’ हे भावनिक गाणं प्रदर्शित करण्यात आलं.

‘माझा अगडबम’ चित्रपटाचे संगीत-दिग्दर्शक तसेच निर्माते टी.सतीश चक्रवर्ती यांना शुभेच्छा देण्यासाठी ए.आर.रेहमान यांनी या सोहळ्याला खास उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे यावेळी नाजुका आणि ए.आर.रेहमान यांची ग्रेटभेटदेखील झाली. तृप्ती भोईर लिखित आणि दिग्दर्शित ‘माझा अगडबम’ चित्रपटाच्या या म्युझिक लॉंच कार्यक्रमात भाजपा प्रवक्त्या शायना एन.सी. यांची देखील खास उपस्थिती लाभली.

मला मराठी संस्कृती आणि भाषा प्रचंड आवडते.विशेष म्हणजे जेव्हा सतीश मराठीमध्ये एक मोठा प्रोजेक्ट करत असल्याचं मला समजलं. तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता, असं ए. आर. रेहमान यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 3:10 pm

Web Title: maaza agadbam music launch
Next Stories
1 ‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’
2 #MeToo : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप
3 #MeToo : सुभाष घईंविरोधात तक्रार दाखल
Just Now!
X