News Flash

VIDEO: देशाला हादरवून टाकणारे अपहरण नाट्य, ‘मदारी’चा ट्रेलर प्रदर्शित

आशयघन संवाद, इरफानचा दमदार अभिनय आणि रोमांच नजराणा

इरफान खान चित्रपटात एका सामान्य व्यक्तीची भूमिका साकारत असल्याचे दिसून येते.

दिग्दर्शक निशिकांत कामत याच्या बहुप्रतिक्षीत ‘मदारी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चित्रपटात अभिनेता इरफान खान पुन्हा एकदा आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकण्यास सज्ज झाला आहे. इरफान खान चित्रपटात एका सामान्य व्यक्तीची भूमिका साकारत असल्याचे दिसून येते. त्याच्या मुलाचा एका अपघातात मृत्यू होतो आणि त्यासाठी तो गृहमंत्र्यांना जबाबदार धरतो. मग अद्दल घडविण्यासाठी गृहमंत्र्याच्या मुलाचेच तो अपहरण करतो आणि येथूनच कहाणीचा रोमांच ट्रेलरमध्ये अनुभवायला मिळत आहे. आशयघन संवाद, इरफानचा दमदार अभिनय आणि रोमांच नजराणा ट्रेलरमध्ये आहे. चित्रपटात अभिनेता जिमी शेरगिल याने पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारली आहे.
दरम्यान, मदारी चित्रपटाची कहाणी एका सत्यघटनेवर आधारीत असल्याचे सांगितले जात असून, मुंबईत अंधेरी-कुर्ला रोडवर मेट्रो ब्रिजचे बांधकाम सुरू असताना झालेल्या अपघाताची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. चित्रपट १० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2016 9:59 am

Web Title: madaari trailer irrfan khan leaves a strong impact on his viewers
Next Stories
1 VIDEO: ‘सैराट’मधल्या ‘आनी’ची निवड ‘लोकांकिका’च्या मंचावरून
2 ‘एक अलबेला’ २४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस
3 जावेद जाफरीचं मऱ्हाठमोळं रॅपसाँग ‘बंद कर राग डोक्यात गेली आग’