प्रेमाच्या दिवशी बॉलिवूडमधील प्रेम प्रकरणाला उजाळा द्यायचा झाल्यास दिलीप कुमार व मधुबाला या जोडीचं प्रेमप्रकरण अविस्मरणीय असेच आहे. ‘मुगल ए आझम’ निर्मितीवस्थेत असतानाच दिलीप कुमार व मधुबाला यांचा ब्रेकअप झाल्याने इतक्या मोठ्या चित्रपटाचे काय? असा प्रश्न उपस्थित झालाच. तेव्हा दिग्दर्शक के. असिफ यांनी ही परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याने चित्रपट पूर्ण होऊ शकल्याची आजही चर्चा होते. दिलीप कुमार व मधुबाला फक्त कॅमेरासमोर अभिनयापुरते बोलत व एकदा का दृश्य ओके झाले की आपण एकमेकांना फारसे ओळखत नाही अशाच थाटात वावरत अशा दंतकथा सांगितल्या जातात. मधुबाला यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ साली झाला होता. बॉलिवूडमध्ये एक वेगळी छाप पाडणाऱ्या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी ह्रदयाला छेद असल्यामुळे निधन झाले होते.

चित्रपटसृष्टीमध्ये जवळ जवळ ७० चित्रपटांमध्ये काम केलेल्या मधुबाला यांनी या क्षेत्रात येण्यासाठी मूळ नाव बदलले होते. त्यांचे मुळ नाव मुमताज असे होते. त्यावेळी मधुबाला यांच्या चित्रपटांना फारसे यश मिळाले नव्हते. साधारणत: त्यांच्या  १० ते १५ चित्रपटांना बॉलिवूडमध्ये चांगले यश मिळाले असले तरी आजही मधुबाला यांच्या नावाला बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान आहे. अभिनयाव्यतिरिक्त दिलीप कुमार यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा होत असतानाच दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा देखील तेव्हा  रंगल्याचे पाहायला मिळाले होते. पण, दिलीप कुमार यांनी मधुबालाशी लग्न करण्यास नकार दिला. दिलीप कुमारांना या प्रकरणामुळे कोर्टाची पायरी देखील चढावी लागली होती. मधुबालाच्या वडिलांनी दिलीप कुमार यांनी आपल्या मुलीला फसविल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता.

Unveiling of Ram Garjana song by MLA Sanjay Kelkar
लोकसभा निवडणुक काळात भाजपाची राम गर्जना, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”

दिलीप कुमार यांनी आत्मचरित्रामध्ये मधुबाला विषयीचे प्रेम व्यक्त केल्याचे देखील पाहायला मिळाले होते. मधुबाला आणि दिलीप कुमार यांनी फक्त आपल्या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काम करावे, असे मधुबालाच्या वडिलांना वाटत होते. दिलीप कुमार यांना हे मंजूर नव्हते. मधुबालाच्या वडिलांचा हस्तक्षेप त्याला दिलीप कुमार यांना पसंत नव्हता. एवढेच नाही तर लग्नानंतर मधुबालाने चित्रपटामध्ये काम करु नये व आपल्या वडिलांशी कोणतेही संबंध ठेवू नये, असे दिलीप कुमार यांना वाटत असल्याचा उल्लेख दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रात केल्याचे दिसते. १९६० सालातील सलीम-अनारकली यांच्या प्रेमकथेवरील के. आसिफ यांचा  ‘मुघल-ए-आझम’ हा चित्रपट आणि त्यातली ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे आजही रसिकांच्या मनात ताजतवानेआहे. या चित्रपटातील मधुबाला- दिलीप कुमार जोडी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.