18 January 2021

News Flash

करणच्या पोस्टला मधुर भांडारकर यांचे उत्तर, म्हणाले…

जाणून घ्या काय म्हणाले...

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी करण जोहर आणि अपूर्व मेहता यांच्यावर चित्रपटाचं नाव कॉपी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर करणने सोशल मीडिया पोस्टद्वारे मधुर यांची माफी मागितली होती. आता मधुर भांडारकर यांनी त्याच्या या पोस्टवर उत्तर दिले आहे.

मधुर भांडारकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी करण जोहरला टॅग केले आहे. ‘प्रिय करण, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्या सिनेक्षेत्रात विश्वास आणि आदर या दोन्ही गोष्टी हातात हात धरुन चालतात. मात्र जेव्हा आपण केलेल्या अलिखित नियमांचं पालन आपणच कुणाचाही साधा विचार न करता करत असू तर बॉलिवूडमधल्या या दोन्ही गोष्टींवर बोलण्याचा हक्क आपल्याला आपोआपच उरत नाही’ या आशयाची पोस्ट मधुर भांडारकर यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, ‘ट्रेड असोसिएशनने नकार दिल्यानंतरही तुम्ही ते टायटल वापरले ज्यामुळे मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण हरकत नाही. मी तुझी माफी स्वीकारतो आणि हे प्रकरण इथेच संपवतो. तुला तुझ्या आगामी प्रोजक्टसाठी माझ्याकडून शुभेच्छा.’

काय म्हणाला होता करण?
‘प्रिय मधुर, आपण गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि आपण या इंडस्ट्रीचा एक भाग आहोत. मी तुझ्या कामाचा खूप मोठा चाहता आहे. मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहात. मी तुझी माफी मागतो. माझ्या सीरिजचे नाव Fabulous Lives of Bollywood Wives असे ठेवले आहे. हे पूर्णपणे एक वेगळे टायटल आहे’ या आशयाची पोस्ट करणने केली होती.

काय आहे प्रकरण?
मधुर भांडारकर सध्या कलाविश्वातील सुपरस्टार्सच्या पत्नींवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचं नाव ‘बॉलिवूड वाइव्ज’ असं आहे. मात्र, याच काळात करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ या सीरिजची घोषणा केली. मात्र, या सीरिजच्या नावावरुन मधुर यांनी संताप व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 6:51 pm

Web Title: madhur bhandarkar accepts karan johars apology avb 95
Next Stories
1 छोट्या पडद्यावरील अभिनेता शाहीर शेखने केले लग्न, फोटो व्हायरल
2 …म्हणून कंगनाने घेतली संजय दत्तची भेट
3 मराठी दिग्दर्शकाचा अटकेपार झेंडा, अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातला प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर
Just Now!
X