07 March 2021

News Flash

‘फॅशन’ चा सिक्वल येणार

प्रियांका चोप्रा, कंगना राणौत आणि मुग्धा गोडसे हिची प्रमुख भूमिका या चित्रपटात होती. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले.

फॅशन

फॅशनविश्वाची काळी बाजू दाखवणारा मधुर भंडारकर यांचा ‘फॅशन’ चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला. प्रियांका चोप्रा, कंगना राणौत आणि मुग्धा गोडसे हिची प्रमुख भूमिका या चित्रपटात होती. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. चित्रपटामुळे प्रेक्षकांना आतापर्यंत न पाहिला गेलेला फॅशनविश्वाचा खरा चेहराही दिसला. फॅशन प्रदर्शित होऊन नुकतीच १० वर्षे पूर्ण झाली. मधुर भंडारकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून टीमचे पुन्हा एकदा आभार मानले. तसेच एका मुलाखतीत या चित्रपटाच्या सिक्वलचा मानस बोलून दाखवला.

फॅशन क्षेत्रात अनेक घडामोडी घडतात इथे प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट आहे. मला त्या सत्य घटनेवरच चित्रपट तयार करायचा आहे. फॅशनच्या सिक्वलसाठी कथा माझ्या डोक्यात आहे. तिला आता पूर्णत्त्वास न्यायचं आहे यासाठी काही दिवस लागतील. सध्या मी दुसऱ्या चित्रपटात व्यग्र आहे तो चित्रपट पूर्ण झाला की मी फॅशनच्या सिक्वलवर काम करायला सुरूवात करेन असंही भंडारकर म्हणाले.

फॅशन चित्रपट एकूण ३ तास १० मिनिटांचा होता मात्र अनेक प्रसंगाना कात्री लावावी लागली त्यामुळे तो अडीच तासाचा झाला. यात अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर दाखवायच्या राहून गेल्या. त्यामुळे सिक्वलमध्ये अशाच काही खऱ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे असंही मधुर भंडारकर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 2:02 pm

Web Title: madhur bhandarkar said subject for a sequel fashion 2 ready
Next Stories
1 Video बंगाली गाण्यामुळे चिडले आसामी, शानवर फेकला कागदाचा बोळा
2 #KedarnathTeaser : केदारनाथ प्रलयावर आधारित साराच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर पाहिलात का?
3 Video : सेल्फीला वैतागून अभिनेत्याने फेकला चाहत्याचा फोन
Just Now!
X