14 October 2019

News Flash

या बॉलिवूड स्टार्सच्या पत्नींवर मधूर भांडारकर आणणार चित्रपट?

या चित्रपटाचे नाव 'बॉलिवूड वाइव्ज' असे ठेवण्यात येणार आहे

मधूर भांडारकर

हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मिळवणारा मराठी दिग्दर्शक ही मधुर भांडारकर यांची ओळख आहे. मधूर भांडारकर हे नेहमी सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करत असतात. सध्याच्या बायोपिकच्या ट्रेन्डमध्ये मधूर सुपरस्टारच्या पत्नीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मीती करणार आहे. हा चित्रपट बॉलिवूडमध्ये सुपरस्टार ठरलेल्या कलाकारांच्या पत्नींच्या जीवनावर आधारित असणार आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट काढण्यात आले होते. परंतु सुपरस्टारच्या पत्नीच्या आयुष्यावरील हा पहिला चित्रपट असणार आहे.

हा चित्रपट शाहरूख खानची पत्नी गौरी खान, शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत आणि राजेश खन्नाची पत्नी डिंपल खन्ना यांच्या आयुष्यावर हा आधारित असणार आहे. तसेच या चित्रपटाचे नाव ‘बॉलिवूड वाइव्ज’ असे ठेवण्यात येणार आहे. मधूर यांनी या चित्रपटाचे नाव सेन्सॉर बोर्डामध्ये रजिस्टर देखील केले आहे. परंतु चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. ‘चित्रपटाचे नाव जाहिर असले तरी चित्रपटाची निर्मीती होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. तसेच या बाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही’ असे मधूर यांच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

सध्या मधूर भांडारकर वाळू माफियांवर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरण्यात व्यग्र आहेत. तसेच या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मधूर अभिनेता शाहरुख खानशी चर्चा करत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतीही ऑफिशीअल घोषणा करण्यात आलेली नाही.

First Published on April 23, 2019 12:31 pm

Web Title: madhur bhandarkar to make a movie based on bollywood star wives