बॉलिवूडमध्ये नेहमीच समाजातील वेगवेगळ्या विषयांवर सिनेमे करण्यासाठी प्रसिद्ध असलेला मधुर भांडारकर आता त्यांचा नवीन सिनेमा घेऊन येत आहे. १९७५ मध्ये पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये लागू केलेल्या आणीबाणीवर हा सिनेमा बेतलेला आहे. याआधी मधुर भांडारकर यांच्या आगामी सिनेमाचे नाव ‘बॉलिवूड वाइफ’ आणि ‘एअर हॉस्टेस’ यांसारखी नावे असतील असे वाटले होते.

पण भांडारकर यांनी ट्विटरवरुन त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव स्पष्ट केले आहे. आणीबाणीवर बेतलेल्या त्यांच्या या सिनेमाचे नाव ‘इंदु सरकार’ असे आहे.  १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केल्यानंतर सुमारे २१ महिने ही आणीबाणी सुरु होती. या दरम्यान जनतेचे मुलभूत हक्कांवर निर्बंध लावण्यात आले होते. भांडारकर यांनी याआधी ‘हिरोइन’, ‘कॅलेंडर गर्ल’, ‘कॉर्पोरेट’ आणि ‘पेज थ्री’ यांसारखे दर्जेदार सिनेमे केले आहेत.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

काही दिवसांपूर्वी उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. या वादात काहीजण पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करत होते. तर काही सरकारच्या निर्णयाचे. निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांनी पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करण्याचे समर्थन केले होते. तेव्हा मधुरने त्यांना ट्विटरवर चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी ट्विटरमध्ये भट्ट यांना टॅग करुन या पाकिस्तानी कलाकांचे समर्थन करणं सोडा, पाकिस्तानात एमएस धोनी सिनेमावर जेव्हा बंदी घालण्यात येत होती तेव्हा तिथल्या कलाकारांनी आक्षेप घेण्याचे कष्टही घेतले नाहीत.