भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पक्की करण्यात आली आहे. व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा चित्रपट येत्या २१ जुलैला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. या चित्रपटामध्ये नील नितीन मुकेशसोबतच दिग्गज अभिनेते अनुपम खेर, टोटा रॉय चौधरी, प्रवीण दाबस, शीबा चंद्रा आणि झाकीर हुसैन हे कलाकार दिसणार असल्याचे ट्विट देखील तरण आदर्श यांनी केले आहे. या चित्रपटातून मधुर भांडारकर यांनी प्रशासनाच्या कचाट्यात सापडलेल्या कवयित्रीची व्यथा मांडली आहे.
#InduSarkar also stars Neil Nitin Mukesh, Anupam Kher, Tota Roy Choudhury, Parvin Dabas, Sheeba Chaddha and Zakir Hussain.
— taran adarsh (@taran_adarsh) April 4, 2017
चित्रपटामध्ये किर्ती कुल्हारी आणि ‘अहिल्या’ फेम टोटा रॉय चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मधुर भांडारकर यांनी २७ मार्चला या चित्रपटाचा फर्स्ट लूक ट्विटरवरुन शेअर केला होता. ज्यामध्ये कवयित्रीची भूमिका साकारणारी किर्ती आणीबाणीच्या काळात प्रशासनाच्या कचाट्यात सापडल्याचे दिसले होते. भांडारकरांच्या ‘इंदू सरकार’ चित्रपटामध्ये नील नितिन मुकेश हा संजय गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर इंदिरा गांधी यांची भूमिका अभिनेत्री सुप्रिया विनोद साकारताना दिसणार आहे.
Madhur Bhandarkar's #InduSarkar to release on 21 July 2017… Stars Kirti Kulhari… Story of a poetess who rebels against the system…
— taran adarsh (@taran_adarsh) April 4, 2017
अनुपम खेर या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसतील. अनुपम खेर यांनी जानेवारीपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना हेलावून सोडण्याची ताकद असल्याचे त्यांनी म्हटले होते. या चित्रपटामध्ये त्यांनी कोणती भूमिका साकारली आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. नुकतेच त्यांनी ‘नाम शबाना’ चित्रपटात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. या चित्रपटात तापसीच्या मार्गदर्शकाची दमदार भूमिका केल्यानंतर अनुपम यांचे नवे रुपदेखील दमदार असेल, अशी त्यांच्या चाहत्यांना नक्कीच अपेक्षा असेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 6:33 pm