News Flash

डान्स दीवानेच्या सेटवर ‘या’ डान्सरला करोनाची लागण

पाहा कोण आहे हा डान्सर

गेल्या काही दिवसांपासून करोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सामान्य नागरिकांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आता छोट्या पडद्यावरील डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स दीवाने’चा सुत्रसंचालक राघव जुयालला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राघवने याची माहिती दिली आहे.

राघवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून ही माहिती दिली आहे. ‘ताप आणि खोकला आल्यानंतर, माझी करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे, माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कृपया काळजी घ्या आणि सर्व प्रोटोकॉलचे पालन करा, सुरक्षित रहा’, अशा आशयाची पोस्ट करत राघवने करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

‘डान्स दीवाने’ या रिअॅलिटी शोचे लाखो चाहते आहेत. या शोमध्ये तुषार कालिया, माधुरी दीक्षित आणि धर्मेश येलांडे परिक्षक आहेत. तर राघव सुत्रसंचालक आहे. काही दिवसांपूर्वी धर्मेशला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्याआधी ‘डान्स दीवाने’च्या सेटवर १८ लोकांना करोनाची लागण झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 10:01 am

Web Title: madhuri dance show host raghav juyal tested corona positive dcp 98
Next Stories
1 “तू पुरुषी आवाजात गाते”, सुनिधी चौहानने सांगितला संगीत दिग्दर्शकाचा ‘तो’ अनुभव
2 मराठी मालिकांचेही राज्याबाहेर चित्रीकरण
3 वयाच्या चाळीशीतही इतकी फिट? या अभिनेत्रीचे अॅब्स पाहिलेत का?
Just Now!
X