नव्वदच्या दशकात सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे ‘दिल’. अभिनेता आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट तुफान गाजला होता. केवळ हा चित्रपटच नाही तर, या चित्रपटातील गाणीदेखील तितकीच लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कायमचा कोरला गेला. विशेष म्हणजे लवकरच या चित्रपटाचा रिमेक येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी ‘दिल’चा रिमेक काढण्याचा मानस व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमात त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा दिल पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या रिमेकविषयी फारशी माहिती अद्याप समोर आली नसून यात नेमके कोणते कलाकार झळकणार हेदेखील स्पष्ट झालेलं नाही.

Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”

वाचा : सनी लिओनीविरोधात केरळमध्ये तक्रार दाखल; ‘या’ प्रकरणाची चौकशी सुरू

‘दिल’च्या रिमेकची कथा ही थोडीफार ‘दिल’प्रमाणेच असणार आहे. मात्र, संहितेमध्ये काळानुरूप काही बदल करण्यात येणार आहेत. तसंच आमिर आणि माधुरी यात झळकणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

सध्या इंद्र कुमार ‘थँक गॉड’ या चित्रपटात व्यस्त आहेत. या चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर इंद्र कुमार ‘दिल’च्या रिमेककडे वळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.