सध्या अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. अशातच लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरीसोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन डान्स करताना दिसत आहे. त्या दोघींचा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
माधुरी दीक्षित आणि क्रिती सेनॉनचा व्हिडीओ डान्सिंग फिवर या इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी आणि क्रिती ‘बिना पायल के ही बजे घुंघरू’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांना आवडला असल्याचे दिसत आहे.
माधुरी आणि क्रितीचा हा व्हिडीओ एखाद्या पुरस्कार सोहळ्यातील असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ जुना असून पुन्हा चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.
काही दिवसांपूर्वी माधुरीचा कलंक आणि टोलटल धमाल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तसेच ती ‘डान्स दीवाने’ या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून दिसत होती. त्याचबरोबर माधुरी आता लवकरच एका नव्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2020 6:22 pm