News Flash

माधुरी दीक्षित सोबत नोरा फतेहीचे ठुमके!; एकाच मंचावर दोन डान्सिंग क्विन

दोघींनी एकत्र येत 'दिलबर' गाण्यावर डान्स केला.

आपल्या डान्सच्या जादूने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या नोरा फतेहीने आजवर अनेक जबरदस्त परफॉर्मन्स दिले आहेत. नुकतीत नोराने ‘डान्स दीवाने-3’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी नोरासोबतच धकधक गर्ल माधुरीनेदेखील ‘दिलबर’ या लोकप्रिय गाण्यावर ठुमके लगावले.’

नोरा आणि माधुरीच्या या दमदार डान्सचा व्हिडीओ नोराच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून बॉलिवूडच्या या दोन जबरदस्त नृत्यांगनांच्या डान्सला चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय.

नोरा फतेहीच्या डान्सचे अनेक चाहते आहेत. आजवर तिची अनेक गाणी गाजली आहेत. यातीलच एक म्हणजे ‘दिलबर’ हे गाणं. या गाण्याला चाहत्यांची कायम पसंती मिळताना पाहायला मिळतं. ‘डान्स दीवाने-3’ च्या मंचावर नोराने या गाण्यावर ठुमके लगावले. यावेळी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरीलाही मोह आवरला नाही. दोघींनी एकत्र येत ‘दिलबर’ गाण्यावर डान्स केला. या खास भागासाठी नोराने सिव्हर कलरचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. तर माधुरीने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. दोघींचा ग्लॅमरस लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by ♥ Bollywood ♥ (@bollydhamal_)

एवढचं नाही तर दोघींनी माधुरीच्या एकेकाळी तुफान गाजलेल्या ‘मेरा पिया घर आया’ या गाण्यावर डान्स केला. माधुरी दीक्षितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हीडीओ शेअर केला असून या व्हीडीओला अवघ्या काही तासात १२ लाखांहून अधिक लाईक मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

‘डान्स दीवाने-3’ च्या येत्या भागात बॉलिवूडमधील दोन नृत्यांगना एकत्र आल्याने चाहत्यांमध्ये दोघीच्या अदा पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 11:59 am

Web Title: madhuri dixit and nora fatehi dance viral on dilbar song in dance deewane kpw 89
Next Stories
1 “कलाकारांच्या मतांना कधीपासून एवढी किंमत आली?”, ‘या’ अभिनेत्रीचा माध्यमांना सवाल!
2 ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावेचा ‘मानापमान’ रुपेरी पडद्यावर
3 मलायका आणि अर्जुनचा झाला साखरपुडा? अंगठी पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
Just Now!
X