01 December 2020

News Flash

अशी सुरू झाली माधुरी दीक्षित- श्रीराम नेने यांची प्रेमकहाणी

तेव्हा श्रीराम यांना माधुरी ही बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आहे याबद्दल किंचितही माहिती नव्हती.

माधुरी दीक्षित व तिचा पती श्रीराम नेने

आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने घायाळ करणारी धक धक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित. नृत्यात तर तिला कोणीच मात देऊ शकत नाही. स्मितहास्य अन् लाजाळू भाव तिच्या सौंर्याला चार चाँद लावतात. तिचा ‘बकेट लिस्ट’ हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं. यासोबतच तिने तिचे डाएट, सिनेमा आणि इतर गोष्टींवर भरभरून गप्पाही मारल्या होत्या.

माधुरी लॉस एंजेलिसला भावाला भेटायला गेली असता तिथे तिची भेट श्रीराम नेनेंशी झाली. तेव्हा श्रीराम यांना माधुरी ही बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आहे याबद्दल किंचितही माहिती नव्हती. यानंतर त्यांच्या भेटी- गाठी होत गेल्या आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
या मुलाखतीत माधुरीला गुगलवर तिच्याशी निगडीत सर्वाधिक सर्च केले जाणारे काही प्रश्न विचारण्यात आले होते.

यातील पहिला प्रश्न होता की, माधुरी दीक्षितचे कोणावर क्रश आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली की, माझे कोणावरही क्रश नाही. लोकांचे माझ्यावर क्रश असते. यानंतरचा प्रश्न होता माधुरी दीक्षितचे खरे नाव काय आहे? हा प्रश्न ऐकल्यावर सुरूवातीला माधुरी थोडी हसली आणि नंतर माधुरी दीक्षित हेच तिचे खरे नाव असल्याचे माधुरीने सांगितले.

गुगलवर अनेकांनी माधुरीचा फोन नंबरसुद्धा सर्च केला आहे. तसेच माधुरी दीक्षितच्या हेअर स्टाइलला काय म्हणतात याबद्दलही गुगलवर खूप सर्च केले जाते. याबद्दल बोलताना माधुरी म्हणाली की, मला माहिती नाही या कटला नक्की काय म्हणत असतील पण ‘माधुरी दीक्षित कट’ याच नावाने बहुधा ही हेअर स्टाइल प्रसिद्ध असावी.

आपल्या डाएटबद्दल बोलताना माधुरी म्हणाली की, तिच्या आहारात जास्तीत जास्त फळं आणि भाज्या असतात. तसेच माधुरी ‘जीवन एक संघर्ष’ या सिनेमासाठी आयुष्यात पहिल्यांदा परदेशात गेली होता. तिच्या दोन्ही मुलांना माधुरीचा ‘हम आपके हैं कौन’ हा सिनेमा आवडतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 12:50 pm

Web Title: madhuri dixit and sriram nene love story ssv 92
Next Stories
1 ‘अन् मग मी सोडून त्रिशूळ, भाला.. हाती stethoscope धरला…’; तेजस्विनी नवदुर्गेचा डॉक्टरांना अनोखा सलाम
2 KGF 2 ठरल्या दिवशीच होणार प्रदर्शित; कर्करोगग्रस्त संजय दत्तने सुरु केली तयारी
3 टायगरने ६ फुट उंच उडून मारली ‘बटरफ्लाय किक’; व्हिडीओ पाहून तारा सुतारीया म्हणाली…
Just Now!
X