News Flash

माधुरीने पहिल्यांदाच ‘या’ चित्रपटात दिला डेथ सीन; फोटो शेअर करत म्हणाली…

माधुरीने पहिल्यांदाच डेथ सीन दिलेला चित्रपट कोणता माहित आहे का?

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितची अदा आणि तिची अभिनय शैली यांच्याविषयी फार काही सांगण्याची गरज नाही. माधुरीने आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट देत प्रेक्षकांची मनं जिंकली. हम आपके है कौन, दिल तो पागल है या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे माधुरीने प्रेक्षक, समीक्षकांची वाहवाह मिळवली. परंतु, या चित्रपटांव्यतिरिक्त तिचा एक चित्रपट गाजला तो म्हणजे परिंदा. या चित्रपटाला ३१ वर्ष पूर्ण झाली असून माधुरीने एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

‘परिंदा’ हा चित्रपट १९८९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे माधुरीने या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. “परिंदाला ३१ वर्ष झाली. या चित्रपटात पारो साकारणं फारच सुंदर अनुभव होता. द मोस्ट पॉवरफुल फिल्म एव्हर मेड ही चित्रपटाची टॅगलाइन खऱ्या अर्थाने समर्पक आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच मी डेथ सीन दिला होता. या चित्रपटातील प्रत्येक कलाकार, क्रू मेंबरसोबतच्या अनेक आठवणी अजूनही स्मरणात आहेत”, असं कॅप्शन माधुरीने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट त्याकाळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. विशेष म्हणजे या चित्रपटामुळे माधुरीने करिअरमध्ये पहिल्यांदाच डेथ सीन दिला होता. त्याकाळी हा सीनदेखील चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 12:14 pm

Web Title: madhuri dixit film parinda completes 31 years of release remembers her first death scene ssj 93
Next Stories
1 मिलिंद सोमणने शेअर केला न्यूड फोटो, म्हणाला…
2 बिग बींनी जोडले स्पर्धकासमोर हात; कारण वाचून व्हाल हैराण
3 जाणून घ्या,बिग बॉसच्या घरात येणारा अली गोणी आहे तरी कोण?
Just Now!
X