27 November 2020

News Flash

डॉ. नेनेंनी खाऊन दाखवली अख्खी हिरवी मिरची, माधुरी दीक्षितला बसला धक्का

पाहा व्हिडीओ

उकडीच्या मोदकांपासून साबुदाण्याच्या खिचडीपर्यंत, अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या युट्युब चॅनलवर विविध खाद्यपदार्थांच्या रेसिपीजचे व्हिडीओ पोस्ट करतेय. नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओत माधुरी नेटकऱ्यांना कांदेपोह्याची रेसिपी सांगताना दिसतेय आणि यात तिची साथ देतोय तिचा पती डॉक्टर श्रीराम नेने.

माधुरीने इन्स्टाग्रामवर याचा टीझर व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये श्रीराम एक अख्खी मिरची खाताना दिसतोय. हे पाहून माधुरीलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. कांदेपोहे बनवण्यात त्याने माधुरीची मदतसुद्धा केली आहे. कांदेपोहे माझ्या आजीला फार आवडायचं आणि आम्ही नाश्त्याला अनेकदा बनवायचो, असं श्रीराम मराठीत सांगतो. तर माझ्या आईची काकू खूप चविष्ट कांदेपोहे बनवायची, असं माधुरी सांगते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

आणखी वाचा : सुशांतचे फेक व्हिडीओ अपलोड करून युट्युबरने कमावले लाखो रुपये

अभिनय आणि नृत्यासोबतच स्वयंपाकाची आवड असणारी माधुरी तिच्या युट्युब चॅनलवर विविध रेसिपीजचे व्हिडीओ पोस्ट करत असते. तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. तिच्या या आवडीत पती श्रीराम नेनेसुद्धा साथ देत आहेत. गेल्या महिन्यात या जोडप्याने लग्नाचा २१वा वाढदिवस साजरा केला. लॉकडाउनदरम्यान माधुरीने पहिल्यांदाच तिच्या गाण्याचा व्हिडीओसुद्धा प्रदर्शित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 11:59 am

Web Title: madhuri dixit husband shriram nene eats a whole chilli watch video ssv 92
Next Stories
1 मिल्खा सिंह यांना पाहून उर्वशी झाली भावूक; आशीर्वाद घेतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
2 सुशांतचे फेक व्हिडीओ अपलोड करून युट्युबरने कमावले लाखो रुपये
3 ‘दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली’; करोनावर मात करताच विराजस कुलकर्णीची खास पोस्ट
Just Now!
X