News Flash

मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार हे ऐकताच माधुरीच्या आईची अशी होती प्रतिक्रिया

माधुरीने तिच्या आईची प्रतिक्रिया काय होती हे या कार्यक्रमात सांगितले आहे.

madhuri dixit,
माधुरीने तिच्या आईची प्रतिक्रिया काय होती हे या कार्यक्रमात सांगितले आहे. (Photo Credit : Madhuri Dixit Instagram and Planet Marathi OTT Instagram)

आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने घायाळ करणारी धक धक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. माधुरीचे लाखो चाहते आहेत. माधुरी आता तिच्या पन्नाशीत असली तरी ती आजही तितकीच सुंदर आणि उत्साही दिसून येते. माधुरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. आता माधुरीने एका कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात हजेरी लावल्यामुळे तिच्या आईला किती आनंद झाला हे तिने सांगितले आहे.

माधुरीने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. माधुरी एक मरामोळी मुलगी आहे. त्यामुळे तिचं मराठीवर असलेलं प्रेम कोणापासून लपलेल नाही. माधुरीने नुकतीच प्लॅनेट मराठीच्या एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावली होती. एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावल्याने माधुरी आनंदी आणि उत्साही होती. यावेळी ती एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहे हे ऐकून तिच्या आईची काय प्रतिक्रिया होती हे तिने सांगितले आहे. ‘माझ्या आईला जेव्हा मी सांगितलं की मी एका मराठी कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहे, तेव्हा ती खूप खुश झाली होती,’ असे माधुरी म्हणाली. तिचा हा व्हिडीओ राजश्री मराठी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

एवढंच नाही तर माधुरीने तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या कलाकारांचे कौतुक केले. तर तिचे आणि तिच्या आईचे मराठीवर असलेले प्रेम पाहून उपस्थित असलेल्या सगळ्यांना आनंद झाला. सध्या माधुरी डान्स दीवाने या शोची परिक्षक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2021 12:05 pm

Web Title: madhuri dixit in marathi show says her mother was very happy about it dcp 98
Next Stories
1 मनी लॉन्ड्रिंग केस: तिहार जेलमधून जॅकलिनला यायचे फोन आणि गिफ्ट्स?
2 “निर्मात्यांनी बावळटपणाचा आव आणण्याचा सल्ला दिला”; हर्षवर्धन कपूरचा खुलासा
3 ‘या’ करणासाठी टायगरने घेतलं वेगळं घर, जॅकी श्रॉफ यांनी केला खुलासा
Just Now!
X