News Flash

माधुरी दीक्षित आजाराने बेजार, उपचारासाठी गाठले अमेरिका

कामाच्या व्यस्ततेमुळे दुखण्याकडे दुर्लक्ष केले

‘धकधक गर्ल’च्या चाहत्यांसाठी ही बातमी थोडी चिंताजनक आहे. खांद्याच्या सततच्या दुखण्याने बेजार झालेली माधुरी सध्या अमेरिकेमध्ये उपचार घेत आहे. माधुरीचे पती श्रीराम नेने स्वतः डॉक्टर आहेत पण तरीही दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी ते अमेरिकेत गेले आहेत.
माधुरी दीक्षित आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून दिसली आहे. तिच्या चेहऱ्यावरचं हासू पाहून कोणालीही ती ठणठणीत बरीच आहे असं वाटत असेल. पण, ते तसं नव्हतं. गेल्या अनेक दिवसांपासून तिला या दुखण्याने ग्रासले आहे. मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे याकडे दुर्लक्ष झाले. आता ती उपचारासाठी अमेरिके गेली तेव्हा तिचे खांद्याचे दुखणे किती गंभीर असेल याचा अंदाज येतो. या दुखण्यामुळे माधुरीला एका रिअ‍ॅलिटी शोच्या शूटींग दरम्यान दीर्घ सुट्टी घ्यावी लागली होती.
डॉक्टर असलेले श्रीराम नेने यांच्यासोबत माधुरीने लग्नगाठ बांधली होती. माधुरीच्या लग्नाला आता १६ वर्षे झाली आहेत. २०११ मध्ये माधुरी तिची दोन्ही मुले रायन आणि अरिनसोबत मुंबईत आली होती. भारतात परतल्यानंतर माधुरीने अनेक रिअ‍ॅलिटी शो जज केलेत. शिवाय ‘डेढ इश्किया’ आणि ‘गुलाब गँग’ सारखे सिनेमेही केलेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 7:55 pm

Web Title: madhuri dixit is in america for shoulder treatment
Next Stories
1 २३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार राधिका आपटेचा बहुचर्चित ‘पार्श’
2 तुम्ही त्या लोकांचं ऐकू नका.. बिग बींचा पत्राद्वारे नातींना बहुमोल सल्ला
3 पूनम पांडेच्या ‘द विकेन्ड’ लघुपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X