एका नजरेने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित. उत्तम अभिनयशैली आणि मनमोहक नृत्यकौशल्याच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.त्यामुळे माधुरीचे आजही असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच माधुरीने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला असून या फोटोची चाहत्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे.
माधुरीने समुद्र किनाऱ्यावरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती समुद्रांच्या लाटांसोबत खेळतांना दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर करत मला पुन्हा त्या जुन्या आठवणींमध्ये घेऊन चला असं ती कॅप्शनमध्ये म्हणत आहे.
‘मला घेऊन चला’, असं म्हणत माधुरीने या फोटोला सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनमध्ये तिने लॉकडाउनच्या काळात घरी बसून काय करता येईल हे सांगितलं आहे. तिचा हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान,लॉकडाउनचा कालावधी सुरु असल्यामुळे सामान्यांप्रमाणेच माधुरीदेखील घरीच आहे. अलिकडेच ती कलंक आणि टोटल धमाल या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता लवकरच ती डान्स दिवाने या रिअॅलिटी शोमध्येदेखील झळकणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 4:10 pm