News Flash

आईच्या भूमिका साकारण्यास माधुरीचा नकार?

देढ इश्किया' आणि 'गुलाब गँग' या २०१४ मध्ये आलेल्या चित्रपटांमध्ये माधुरी शेवटची दिसली होती.

आईच्या भूमिका साकारण्यास माधुरीचा नकार?
माधुरी दीक्षित

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित चार वर्षांनंतर ‘टोटल धमाल’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटात ती तब्बल १८ वर्षांनंतर अभिनेता अनिल कपूरसोबत काम करताना दिसेल. ‘देढ इश्किया’ आणि ‘गुलाब गँग’ या २०१४ मध्ये आलेल्या चित्रपटांमध्ये माधुरी शेवटची दिसली होती.

वाचा : ‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडीने घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज

माधुरीचे चाहते असंख्य आहेत. त्यामुळे आपली आवडती अभिनेत्री पुन्हा कधी रुपेरी पडद्यावर दिसणार याचीच सर्वांना उत्सुकता होती. पण, माधुरी मात्र तिच्याकडे येणारे चित्रपट लागोपाठ नाकारत होती. सुत्रांच्या माहितीनुसार, अनेक दिग्दर्शक माधुरीकडे काही महत्त्वाच्या भूमिका घेऊन जायचे. पण, आईची भूमिका असल्याचे कळताच माधुरी त्या भूमिका नाकारत होती. शाहरुख, सलमान आणि आमिर या खान अभिनेत्यांसोबत चाहत्यांना तिला बघायचे आहे, असेच माधुरीला वाटत होते. काही वर्षांपूर्वी अनिल कपूरने तिला एका चित्रपटात सोनमच्या आईची भूमिका साकारण्याची ऑफर दिली होती. माधुरीला ती भूमिका काही आवडली नाही आणि मुळातच तिला आईची भूमिका साकारण्यात रसही नव्हता. सध्याच्या घडीला तरुण अभिनेत्री करत असलेल्या भूमिका तिला मिळायला हव्यात असे माधुरीला वाटत होते.

वाचा : जेव्हा सारा तेंडुलकरही एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा वापरते

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, करिष्मा कपूर, जुही चावला आणि ९०च्या दशकातील इतर काही अभिनेत्रींना पडद्यावर आईची भूमिका साकारण्याच्या विचारानेच घाम फुटायचा. या अभिनेत्रींच्या यादीत आता माधुरीचेही नाव जोडले गेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2017 11:42 am

Web Title: madhuri dixit not keen to play a mother in movies yet
Next Stories
1 TOP 10 NEWS : सलमानने दत्तक घेतलेल्या आजींपासून माधुरीवरील दबावापर्यंत
2 ‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडीने घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज
3 Photo: अक्षय कुमार जेव्हा केपटाऊनमध्ये मासेमारी करतो
Just Now!
X