20 February 2019

News Flash

पुन्हा एकदा माधुरीच्या नजरेनं वाढवली चाहत्यांची धकधक

१९९५ सालच्या गाण्याच्या स्टेप्स आजही तिला आठवत असल्याचं दिसून आलं.

माधुरी दीक्षित

कायमच चाहत्यांच्या हृदयाच्या धकधक वाढविणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली असून ती लवकरच ‘कलंक’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर संजय दत्तदेखील स्क्रिन शेअर करणार आहे. गेल्या अनेक दशकापासून माधुरीने बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवलं असून तिचं आजही नृत्यावर तेवढंच प्रेम असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे १९९५ सालच्या गाण्याच्या स्टेप्स आजही तिला आठवत असल्याचं दिसून आलं.

सध्या माधुरी छोट्या पडद्यावरील ‘डान्स दीवाने’ या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका निभावत असून या कार्यक्रमामध्ये तीने तिच्या जुन्या चित्रपटांच्या काही आठवणींना उजाळा दिला. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘राजा’ चित्रपटामध्ये माधुरीने ‘अखियॉ मिलाऊ कभी अखियॉ मिलाऊ’ या गाण्यावर डान्स केला होता. मात्र या गाण्याला २३ वर्ष उलटल्यानंतरही तिला त्या गाण्यातील स्टेप्स आठवत असल्याचं दिसून आले.

@madhuridixitnene . . . #instabolly #bollywood

A post shared by Bollywood Entertainment (@lnstabolly) on

या कार्यक्रमामध्ये माधुरीने ‘अखियॉ मिलाऊ कभी अखियॉ मिलाऊ’ या गाण्यावर पुन्हा एकदा डान्स करुन प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे माधुरीचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून त्याच्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, या गाण्यावर थिरकताना माधुरीने २३ वर्षापूर्वी जे एक्सप्रेशन्सस दिले होते.तेच आजही दिल्याचं पाहायला मिळालं. बॉलिवूडमध्ये सक्रिय झालेल्या माधुरीचा नुकताच ‘बकेट लिस्ट’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरल्याचं दिसून आलं.

 

First Published on July 12, 2018 11:19 am

Web Title: madhuri dixit recreates her famous dance