12 December 2017

News Flash

मेकअपशिवाय समोर आलेल्या माधुरीने छायाचित्रकारांपासून लपविला चेहरा

हिच का ती माधुरी दीक्षित?

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 21, 2017 5:16 PM

माधुरी दिक्षित

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ही एक अशी अभिनेत्री आहे जिने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिकांद्वारे आणि तिच्या अदांच्या मदतीने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. तिची एक झलक पाहण्यासाठीसुद्धा चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. पण, सध्या सोशल मीडियावर या ‘धक धक गर्ल’चे फोटो पाहता हीच का माधुरी दीक्षित असाच प्रश्न अनेकांना पडत आहे.

वांद्रे येथे नुकतेच माधुरीला तिच्या पतीसोबत पाहण्यात आले होते. त्यावेळी जरासाही मेकअप न केल्यामुळे माधुरीने छायाचित्रकारांना पाहताच तिचा चेहरा लपवला. नेहमीच्या लूकपेक्षा यावेळी माधुरी अगदी वेगळीच दिसत होती. चेहरा लपवूनही माधुरीचे फोटो काढण्यात काही छायाचित्रकांरांना यश मिळाले आणि तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

ज्या अभिनेत्रीला पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला गर्दी होते. जिच्या हसण्यावर अनेकजण त्यांचे भान हरपून जातात अशी माधुरी आणि तिचे हे रुप पाहता माधुरीच्या वाढत्या वयाची झलक तिच्या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. सध्या माधुरी दीक्षित-नेने कोणत्याही चित्रपटामध्ये व्यग्र नसून २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुलाब गॅंग’ या चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यावर झळकली नाहीये. यंदाच्या वर्षी बी टाऊनची ही धकधक गर्ल वयाची पन्नास वर्षे पूर्ण करणार आहे.

madhuri_lead_1487236094

dsc_8801_1487236093

First Published on February 17, 2017 6:41 pm

Web Title: madhuri dixit seen without makeup looked pale and aged