News Flash

माधुरीने विकला मुख्यमंत्र्यांनी दिलेला बंगला

विक्रीबाबतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या आपल्या बंगल्यामुळे जोरदार चर्चेत आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला बंगला माधुरीने विकल्यामुळे सगळीकडे याची जोरदार चर्चा रंगली आहे. तिने हरयाणामधील पंचकूला येथील आपला बंगला विकला आहे. तिचे पती डॉ. श्रीराम माधव नेने यांनी या बंगल्याच्या विक्रीबाबतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. ग्लोबल ट्रॅव्हल कंपनीने या बंगल्याची खरेदी केली आहे.

Photo :  गोव्याच्या किनाऱ्यावर अण्णा आणि शेवंताची सफर…

“इस बार सामने गब्बर हो या शाकाल हम भी देखेंगे”; बिग बींच्या पोस्टवर अनुरागची प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

बावरा मन

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

अक्षयसाठी ‘बॅड न्यूज’; चित्रपटाविरोधात याचिका दाखल

आईच म्हणाली २२ वर्षांच्या तरुणीला डेट कर, अभिनेत्याचं स्पष्टीकरण

हा बंगला हरियाणाच्या पंचकूला एमडीसी सेक्टर चारमध्ये होता. माधुरीने हा बंगला ३ कोटी २५ लाख रुपयांना विकला आहे. माधुरीला हा बंगला १९९६ साली हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांनी मुख्यमंत्री कोट्यातून दिला होता. गेल्या महिन्यात माधुरीचे पती डॉ नेने हरयाणात गेले होते. त्याच दरम्यान बंगल्याचा व्यवहार पूर्ण झाल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 5:39 pm

Web Title: madhuri dixit sells her bungalow mppg 94
Next Stories
1 Photo : ‘मेकअप’मधील रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?
2 सयाजी शिंदेंचा प्रेरणादायी प्रयोग, उजाड माळरानावर फुलवलं नंदनवन
3 अक्षयसाठी ‘बॅड न्यूज’; चित्रपटाविरोधात याचिका दाखल
Just Now!
X