News Flash

…म्हणून माधुरीने शेअर केलेल्या फोटोची होत आहे चर्चा

माधुरीने शेअर केला मनमोहक फोटो

फोटो सौजन्य- माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम पेज

उत्तम अभिनयशैली आणि मनमोहक नृत्यकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. या लॉकडाउनच्या काळात चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी इन्स्टाग्रामवर अनेक वेळा व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असते. अलिकडेच माधुरीने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला असून या फोटोची चाहत्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या फोटोपेक्षा माधुरीने दिलेलं कॅप्शन अनेकांच लक्ष वेधत आहे.

माधुरीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने कॅप्शन म्हणून एक शायरी जोडली आहे. ज्यामुळे अनेकांचं लक्ष या फोटोकडे वेधलं जात आहे. “लाकर थोड़ी सी खुशी अपने चेहरे पर, हमने खुद को दूसरों से अलग बना लिया, लोग ढूंढ़ते रहे मुस्कुराने का कारण, हमने दूसरों की खुशी को अपना बना लिया,” असं कॅप्शन माधुरीने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान,लॉकडाउनचा कालावधी सुरु असल्यामुळे सामान्यांप्रमाणेच माधुरीदेखील घरीच आहे. अलिकडेच ती कलंक आणि टोटल धमाल या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता लवकरच ती डान्स दिवाने या रिअॅलिटी शोमध्येदेखील झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 1:08 pm

Web Title: madhuri dixit shares her old photo and do shayari post viral on internet ssj 93
टॅग : Madhuri Dixit
Next Stories
1 नियमावलीचं पालन करत ‘या’ मराठी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण
2 VIDEO : अनुपम खेर यांनी आपल्या आईला करोना झाल्याचं सांगितलं नाही; कारण…
3 “गणितात नियम नाहीत, फक्त जादू आहे”; विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’चा मजेशीर ट्रेलर पाहिलात का?
Just Now!
X