28 September 2020

News Flash

क्वारंटाइनमध्ये माधुरीची लेकासोबत डान्स जुगलबंदी; शेवटपर्यंत पाहा व्हिडीओ

अरिनने आईला तबल्यावर साथ दिली असून व्हिडीओअखेर तोसुद्धा तिच्यासोबत कथ्थकचे काही तोडे गिरवताना दिसतो.

माधुरी दीक्षित व तिचा मुलगा अरिन

लॉकडाउनमुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच घरी आहेत. मोकळ्या वेळात काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच सतावत आहे. काहीजण स्वयंपाक, काही चित्र काढून, काहीजण योगा करून तर काही जण डान्स करून क्वारंटाइनचा वेळ घालवत आहेत. बॉलिवूडची सर्वोत्तम नृत्यांगना व अभिनेत्री माधुरी दीक्षितने क्वारंटाइनमध्ये तिच्या मुलासोबत जुगलंबदी केली आहे. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

माधुरीने लहानपणापासूनच कथ्थकचं प्रशिक्षण घेतलंय. याचीच आवड तिला लॉकडाउनमध्ये मदत करत आहे. त्यात तिला आता मुलाचीही साथ मिळाली आहे. माधुरीचा मोठा मुलगी अरिन याच्यासोबत ती नृत्याची जुगलबंदी करताना दिसत आहे. अरिनने आईला तबल्यावर साथ दिली असून व्हिडीओअखेर तोसुद्धा तिच्यासोबत कथ्थकचे काही तोडे गिरवताना दिसतो. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीत उतरला आहे.

आणखी वाचा : सर्वांत पहिला यशस्वी सर्जिकल स्ट्राइक; रामायणात रावणाच्या वधानंतर मीम्सना उधाण

‘आपल्याला ज्या गोष्टी नेहमी करायच्या होत्या, त्या करण्याचा वेळ क्वारंटाइन देत आहे. माझी काय इच्छा होती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा’, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय. परदेशात असूनही माधुरीने तिच्या मुलांना शास्त्रीय नृत्याचं शिक्षण देतेय, हे कौतुकास्पद आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 1:59 pm

Web Title: madhuri dixit teaches kathak to son arin watch video ssv 92
Next Stories
1 Video : ‘बाहर जाओगे तो पिटोगे’; कार्तिकच्या प्रश्नावर पोलिसांचं भन्नाट उत्तर
2 “आपलं सरकार केवळ भाषण देतं, अक्षय कुमारचा देश बघा”; अभिनेत्याचा मोदी सरकारवर निशाणा
3 ‘२१ दुणे ४२’मध्ये आज स्पृहा जोशी व कॅप्टन वैभव दळवी करणार कथांचं अभिवाचन
Just Now!
X