News Flash

‘कलंक’साठी माधुरी झाली आलिया भट्टची ‘डान्स गुरू’

याआधीही 'तम्मा तम्मा' या गाण्यातील प्रसिद्ध स्टेप माधुरीने आलियाला शिकवली होती.

आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, वरुण धवन

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षित ही एक अशी अभिनेत्री आहे जिने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिकांद्वारे आणि तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. आता हीच अभिनेत्री कलाकारांसाठीही डान्स गुरु बनल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी ‘कलंक’ या चित्रपटासाठी माधुरी आलियाचा डान्स शिकवत असल्याचं कळतंय.

करण जोहरच्या आगामी ‘कलंक’ या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये सहा कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन आणि आदित्य रॉय कपूर अशी या चित्रपटातील स्टारकास्ट आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार यातील एका गाण्यासाठी माधुरी आलिया आणि कियारा अडवाणी यांना नृत्याचे धडे देत आहे. कियारा अडवाणी या एका गाण्यापुरती चित्रपटात झळकणार असून तीसुद्धा बरीच मेहनत घेत आहे.

वाचा : बहिण सोनमला हर्षवर्धनकडून लग्नाचा ‘हा’ खास गिफ्ट 

आलियाच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटातील ‘तम्मा तम्मा..’ गाण्यासाठीही माधुरीने तिची मदत केली होती. ‘तम्मा तम्मा’ या गाण्याची प्रसिद्ध डान्स स्टेप माधुरीने वरुण आणि आलियाला शिकवली होती. आता मोठ्या पडद्यावर माधुरी आणि आलियाच्या अभिनय आणि नृत्याची जादू पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 4:57 am

Web Title: madhuri dixit turns dance guru for alia bhatt for kalank
Next Stories
1 नाटकाचा शस्त्र म्हणून वापर करा – नाना पाटेकर
2 ताणमुक्तीची तान :  मी थांबत नाही..
3 बहिण सोनमला हर्षवर्धनकडून लग्नाचं ‘हे’ खास गिफ्ट
Just Now!
X