हॉलिवूड निर्माता हार्वी विनस्टीनने अभिनेत्रींचे लैंगिक शोषण केल्याचा खुलासा झाला आणि सोशल मीडियावर या विषयीच्या बऱ्याच गोष्टी उघड झाल्या. #MeToo या हॅशटॅगअंतर्गत बऱ्याच नेटकऱ्यांनी आपल्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाचे प्रसंग सर्वांसमोर मांडले. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि टेलिव्हिजन कलाकारही मागे नाहीत. लैंगिक शोषणाच्या शिकार झालेल्या बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेले ‘ते’ प्रसंग मोठ्या धाडसाने सर्वांसमोर मांडले. काही दिवसांपूर्वीच रिचा चड्ढाने कशाप्रकारे बॉलिवूडमध्येही लैंगिक अत्याचाराचे जाळे पसरले आहे त्याचा खुलासा केला. पण, त्या व्यक्तीचे नाव तिने जाहीर करण्यास नकार दिला. जर मला संरक्षण मिळाले तरच मी बॉलिवूडमधील हार्वी विनस्टीनच्या नावाचा खुलासा करेन असे तिने म्हटले होते.

वाचा : सोनाक्षी सिन्हावर रत्ना पाठक शहा यांची सडकून टीका

Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

#MeToo हॅशटॅगमुळे अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिला एकदा जबरदस्तीने रेप सीन करावा लागला होता. या घटनेची माहिती एका ट्विटर युजरने लागोपाठ ट्विट करत दिली. झेहरा काझमी असं त्या ट्विटर युजरचे नाव असून, तिला ही माहिती अन्नू कपूर यांच्या एका कार्यक्रमातून मिळाली. हा किस्सा सांगताना प्रेक्षकांना तो अधिक रंजक कसा वाटेल याची अन्नू यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. दिग्दर्शक बापू यांनी रणजीतसोबत रेप सीन असल्याची माहिती माधुरीला दिलेली तेव्हा खरंतर हे दृश्य करण्यास तिने नकार दिला होता. पण, काहीही झालं तरी तुला हे दृश्य करावेच लागेल (रेप सीन तो होगा) या शब्दात दिग्दर्शकाने माधुरीवर रेप सीनसाठी दबाव टाकला. विशेष म्हणजे ते दृश्य चित्रीत झाल्यानंतर संपूर्ण टीमने तेव्हा टाळ्या वाजवल्या होत्या.

वाचा : तुम्हा सैनिकांना शत्रूला मारायला शिकवलंय त्यामुळे तुम्हाला मरण्याचा अधिकार नाहीये- नाना पाटेकर

झेहरा यांच्या ट्विटनंतर अनेक नेटीझन्सनी यावर आपला राग व्यक्त केला. हे खूप भयानक, वाईट आहे….. ते वेडे आहेत का? अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटीझन्सनी दिल्या.