News Flash

माझा मुलगा अडल्ट झालाय; माधुरीने वाढदिवसाला केली खास पोस्ट

माधुरीच्या मुलाचे नाव अरिन आहे.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा मोठा मुलगा अरिन आज १७ मार्च रोजी अठरा वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त माधुरीने त्याच्या लहानपणीचा फोटो आणि आताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून चाहत्यांनी फोटोवर कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

माधुनीने अरिनच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये माधुरीने अरिनला उचलून घेतले आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये माधुरी अरिनच्या बाजूला बसल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत माधुरीने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘माझा मुलगा आता अडल्ट झाला आहे. अरिन तुला १८व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.. स्वातंत्र्य असले की जबाबदाऱ्या देखील वाढतात. आजपासून हे जग तुझे आहे आनंदाने जग. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोनं कर.. मी आशा करते की तुझा जिवनप्रवास हा अविस्मरणीय असेल’ या आशयाचे कॅप्शन माधुरीने दिले आहे.

माधुरीने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. रितेश देशमुखने कमेंट करत ‘वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा यंग मॅन..’ असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी माधुरीचा धाकटा मुलगा रियानचा देखील वाढदिवस होता. त्यावेळी देखील तिने केलेली पोस्ट चर्चेत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 5:55 pm

Web Title: madhuri dixit wishes her son arin on birthday avb 95
Next Stories
1 नचिकेत आणि केतकर कुटुंबीय म्हणत आहेत ‘डोन्ट रष’
2 मौनी रॉयचं अखेर ठरलं! ; लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
3 प्रिया बापट आणि उमेश कामतला करोनाची लागण
Just Now!
X