‘धक धक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षितने पत्राच्या माध्यमातून अभिनेत्री करिना कपूर खानची प्रशंसा केली आहे. शाहरुख खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बातें विथ बादशहा’ या शोमध्ये नुकतीच तिने हजेरी लावली. या शोदरम्यान तिने करिनासाठी लिहिलेलं ते खास पत्र शाहरुखकडे सोपवलं.

या पत्रात तिने लिहिलं की, ‘तू फक्त स्वत:ची नाही तर आम्हा सर्वांची आवडती व्यक्ती आहेस. तुला स्क्रीनवर पाहताना एक वेगळीच मजा येते. मुलाच्या जन्मानंतर तू ज्याप्रकारे तुझ्या करिअरकडेही लक्ष देत आहेस, ते पाहून मला तुझा अभिमान वाटतो. प्रत्येक आईसाठी तू एक आदर्श आहेस.’

वाचा : ‘लैंगिक शोषणकर्त्यांचं नाव सांगेन पण एका अटीवर…’

शाहरुखच्या या शोमध्ये बऱ्याच अभिनेत्रींनी हजेरी लावली. करिनासुद्धा तिची मैत्रीण अमृता अरोरासह शोमध्ये सहभागी झाली होती. करिनाचा मुलगा तैमुर आणि शाहरुखचा मुलगा अबराम मोठे झाल्यावर एकमेकांसोबत नक्कीच काम करतील, असं किंग खान मजेशीरपणे या शोमध्ये बोलून गेला. खरंतर तैमुर आणि अबरामचं स्टारडम कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. भविष्यात या दोघांना एकत्र पाहायला चाहत्यांनाही नक्कीच आवडेल.