एखादी अभिनेत्री आपल्या चित्रपटात दुस-या अभिनेत्रींना काम देतेय हे चित्र जरा दुर्मिळचं दिसतं. पण प्रियांका आणि फ्रेडा पिंटो निर्मिती करत असलेल्या चित्रपटात तब्बल आठ अभिनेत्री दिसणार आहेत.
‘गर्ल रायजिंग – वो पढेगी, वो उडेगी’ असे चित्रपटाचे नाव आहे. स्वत: प्रियांका, माधुरी दीक्षित, करिना कपूर, सुष्मिता सेन, नंदिता दास, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, करिना कपूर यांसारख्या एकाहून एक ८ सरस अभिनेत्री या चित्रपटात दिसणार आहेत. माजी विश्वसुंदरी प्रियांका चोप्रा आणि ‘स्लमडॉग मिलेनीयर’ फेम अभिनेत्री फ्रेडा पिंटो या दोघी मिळून या चित्रपटाची निर्मीती तर करणार आहेतचं पण त्यासोबत अभिनयदेखील करणार आहेत. या चित्रपटाबद्दलची आणखी एक विशेष बाब म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांचा भारदस्त आवाज चित्रपटाला लाभला आहे. सामाजिक आशयावर बेतलेला हा चित्रपट येत्या रक्षाबंधनच्या दिवशी दुपारी १.३० वाजता स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. भारत सरकारचे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आणि स्टार टीव्हीने एकत्रितपणे चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रेक्षकांना हिंदीसोबतच इंग्रजी भाषेतही हा चित्रपट पाहता येणार आहे.