19 January 2020

News Flash

‘ही’आहे माधुरीची सुप्त इच्छा

कलाक्षेत्रातील दोन दिग्गज कलाकार माधुरीला नृत्यासाठी कायम प्रेरणा देतात.त्यांच्यासोबत काम करण्याची तिची इच्छा होती

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या दिलखेचक अदांनी नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करत असते. माधुरीच्या अभिनयकौशल्यासोबतच तिचं नृत्यकौशल्यही तितकच देखणं आहे.कलाक्षेत्रातील दोन दिग्गज कलाकार माधुरीला नृत्यासाठी कायम प्रेरणा देतात. सुप्रसिद्ध ‘जीन केली’ आणि ‘वैजयंतीमाला’ यांच्याकडून माधुरीने कायमच प्रेरणा घेतली आहे.

कलर्स वाहिनीवरील आगामी ‘डान्स दिवाने’ या शोमध्ये माधुरी परीक्षक म्हणून दिसणार आहे. माधुरीने नुकतच या शोसाठी एका संगीत व्हिडीओचे चित्रीकरण केले आहे. या दरम्यान तिने तिच्या मनातील काही सुप्त इच्छा सांगितल्या. ‘जीन केली’ आणि ‘वैजयंतीमाला’ यांच्यासोबत काम करण्याची तिची इच्छा होती असं तिने सांगितलं.’अॅन अमेरिकन इन पॅरिस’ आणि ‘अँकर्स अवेई’ या चित्रपटांमधील कामांसाठी ‘जीन केली’ प्रसिद्ध आहे. माधुरीला रंगमंचावर ‘जीन केली’ यांच्यासारखं परफॉर्म करण्याची इच्छा आहे. “मला त्यांच्या दिग्दर्शनाखाली एका संगीत नाटकातही काम करायला आवडलं असतं.” अशी इच्छाही माधुरीने व्यक्त केली. माधुरी म्हणाली की,”जीन केली आणि वैजयंतीमाला यांच्यासोबत काम करायला मिळालं असतं तर मला खूप आनंद झाला असता.ते जणूकाही माझं स्वप्न होतं. या दोघांनी नृत्याला प्रतिष्ठा आणि ओळख मिळवून दिली.हे दोघं खऱ्या अर्थाने नृत्यासाठी वेडे होते आणि मी सुद्धा त्यांच्याकडूनच प्रेरणा घेते.”

वैजयंतीमाला पहिल्या महिला सुपरस्टार होत्या ज्यांनी भारतीय चित्रपटांमधील नृत्याची शैली पूर्णपणे बदलून टाकली. म्हणूनच माधुरी त्यांच्याकडून प्रेरणा घेते. कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो ‘डान्स दिवाने’चा दुसरा सिझन लवकरच येणार असून या सिझनमध्ये नृत्याची पातळी उंचावली आहे.

First Published on May 22, 2019 7:27 pm

Web Title: madhuri takes inspiration from gene kelly and vaijayantimala
Next Stories
1 स्माईल फाउंडेशनच्या कार्यक्रमातून विवेक ओबेरॉयला वगळले
2 सलमान म्हणतोय,”आलिया माझ्यापेक्षा जास्त प्रतिभावंत कलाकार”
3 एक ट्विट अन् विवेकनं सलमानलाही टाकलं मागे
Just Now!
X