बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यासोबत काम केलेले अभिनेते सतीश कौल यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतीश कौल यांची प्रकृती खालावली होती. त्यातच त्यांना करोनाची लागण झाली. करोनाची लागण झाल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावली. 10 एप्रिलला त्यांची प्राणज्योत मालवली. ते 74 वर्षांचे होते.

सतीश कौल यांनी ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत इंद्राची भूमिका साकारली होती. सतीश कौल यांनी ३०० हून अधिक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र उतारवयात त्यांच्याकडे उपचारासाठी देखील पुरेसे पैसै नव्हते.

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

सतीश कौल यांचा प्रवास
सतीश कौल यांनी ३०० हून अधिक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच त्यांनी ‘प्यार तो होना ही था’, ‘आंटी नंबर १’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. विक्रम और वेताल’ सारख्या कार्यक्रमातही झळकले होते. सतीश कौल यांनी २०११ मध्ये पंजाबला जाऊन अॅक्टिंग क्लास सुरु केला होता.मात्र 2015 मध्ये पाठीचं हाड मोडल्याने जे काम सुरु होतं ते थांबवावं लागलं. दोन वर्ष ते रुग्णालयात होते. नंतर त्यांना वृद्धाश्रमात जावं लागलं. तिथे ते दोन वर्ष राहिलो.गेल्या काही दिवसांपासून ते भाड्याच्या घरात राहत होते. लॉकडाउनमुळे त्यांची परिस्थिती बिकट होऊ लागली होती. त्यांच्याकडे औषधासाठी पुरेसे पैसे नव्हते. “औषधं, भाजी आणि काही मुलभूत गोष्टींसाठी मी झगडत आहे. मला मदत करा.अभिनेता असताना माझ्यावर इतक्या जणांनी प्रेम केलं. पण आता मला एक माणूस म्हणून मदतीची गरज आहे,” असं म्हणत त्यांनी मदतीची याचना केली होती.

काय होती त्यांची अखेरची इच्छा

आपण अभिनय करत असताना लोकांनी जे प्रेम दिलं त्याचा फार अभिमान वाटतो असं सांगताना आपल्याला सध्या कोणतीही तक्रार नसल्याचंही ते म्हणाले होते. “जर लोक मला विसरले असतील तर ठीक आहे. मला खूप प्रेम मिळालं असून त्यासाठी मी आभारी आहे. मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. मी राहू शकेन असं व्यवस्थित घर विकत घेण्यासाठी मी सक्षम व्हावं एवढीच अपेक्षा आहे. मी अजूनही जिवंत आहे आणि सगळं काही संपलेलं नाही. मला कोणीतरी काम द्यावं अशी अपेक्षा आहे. मला पुन्हा अभिनय करायचा आहे,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.