बीआर चोपडा यांची ‘महाभारत’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका १८ मे रोजी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लॉकडाउनच्या काळात घरात अडकून पडलेल्या व्यक्तींच्या मनोरंजनासाठी प्रशासनाने ८० ते ९०च्या दशकातील सर्व जुन्हा मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. या यादीमधील ‘महाभारत’ मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते. आता ही मालिका पुन्हा प्रदर्शित होणार असल्याने चाहते फार आनंदी आहेत.

‘महाभारत’ ही मालिका १८ मे पासून स्टार भारत वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. तसेच दररोज रात्री ८ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार भारत वाहिनीने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Heavy rain expected in the next 24 hours
येत्या २४ तासात मुसळधार पावसाची हजेरी, आठवड्याची अखेरही पावसानेच
IND vs BAN T20I 2024 Starts On 28th April Women Team India Take Revenge of Harmanpreet Kaur
IND vs BAN Women’s T20I ‘या’ दिवशी होणार सुरु; २०२३ मधील ‘त्या’ वादाचा बदला घेणार का हरमनप्रीतची सेना?
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

बीआर चोपडा यांच्या महाभारत या मालिकेमध्ये मुकेश खन्ना, पंकज धीर, गजेंद्र चौहान, रुपा गांगुली, पुनीत इस्सर, नितीश भारद्वाज, गुफी पटेल, हरीश भिमानी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेते. ही मालिका पुन्हा पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. महाभारतासोबतच रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका देखील पुन्हा स्टारप्लस वाहिनीवर पुन्हा प्रदर्शित होत आहे. ४ मे पासून दररोज ७ वाजून ३० मिनिटांनी प्रदर्शित होत आहे.