News Flash

राज्यात चित्रीकरणाचा मार्ग झाला सुलभ, एक खिडकी योजना सुरू

निर्मात्यांनी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व अटी-शर्तींच्या पूर्ततेबरोबरच शुल्काचा भरणा केल्यास चित्रिकरणासाठी आवश्यक असलेल्या स्थळाबाबतच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण होईल.

राज्यात चित्रीकरणाचा मार्ग झाला सुलभ, एक खिडकी योजना सुरू
संग्रहित छायाचित्र

चित्रपट, मालिका, जाहिरातपट व माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध सरकारी परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सध्या ही योजना मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यापुरती राबविण्यात येणार असून त्यानंतर त्याचा विस्तार करण्यात येणार आहे.

राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. त्यांच्या चित्रीकरणासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एक खिडकी योजना सुरु केली जाणार आहे. या निर्णयामुळे निर्मात्यांना सरकारी स्थळावरील चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानग्यांबाबतचा निर्णय पंधरा दिवसांच्या आत कळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमधील महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ सनियंत्रक राहणार असून ही योजना सेवा हमी कायद्यांतर्गत देखील आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या १४ विभागांतर्गत येणाऱ्या स्थळांचा यात समावेश करण्यात आला आहे.

निर्मात्यांनी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व अटी-शर्तींच्या पूर्ततेबरोबरच शुल्काचा भरणा केल्यास चित्रिकरणासाठी आवश्यक असलेल्या स्थळाबाबतच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर सनियंत्रक संस्था संबंधित शासकीय यंत्रणेकडून परवानगी घेईल. संबंधित यंत्रणेने कार्यालयीन कामकाजाच्या सात दिवसांत कोणताही प्रतिसाद दिला नाही तर चित्रिकरणास हरकत नाही असे ठरवून परवानगी देण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2018 7:08 pm

Web Title: maharashtra cabinet approves single window system for film tv shoot permission
Next Stories
1 ‘लव्हगुरु’ सुमेध गायकवाड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2 VIDEO : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘मयत’च्या टीझरमध्ये ‘त्या’ दाहक वास्तवाचं दर्शन
3 पूजा सावंतला ‘दादासाहेब फाळके एक्सिलन्स अवॉर्ड’
Just Now!
X