अभिनेता संजय दत्तच्या अडचणींमध्ये भर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत असेच म्हणावे लागेल. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या वेळी शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याची शिक्षा पूर्ण व्हायच्या आठ महिने आधी त्याची सुटका का करण्यात आली? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला विचारला होता. याप्रकरणी राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. यावर आता महाराष्ट्र सरकारने उत्तर देण्यास तयार असल्याची माहिती गृहविभागाच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

स्वतःवरचेच व्हायरल जोक्स जेव्हा रिंकू वाचते…

संजय दत्तला कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आली नसून सर्व तुरुंगातील नियमांचे पालन करून त्याची सुटका करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने त्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. हाय- प्रोफाइल प्रकरणं ही नेहमीच संवेदनशील असतात. या प्रकरणांवर अधिक नजरा असतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची सूट देण्याची शक्यताच नसते, असे गृह विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पाकिस्तानच्या विजयावर ऋषी कपूरचे ट्विट, चाहते भडकले

संजय दत्तच्या तुरुंगवासात तो डिसेंबर २०१३ मध्ये ९० दिवसांसाठी बाहेर होता. नंतर त्याने अजून ३० दिवसांची सुट्टी मागितली होती. मात्र शिक्षेचे ४२ महिने पूर्ण व्हायच्या आठ महिने आधी म्हणजेच फेब्रुवारी २०१६ मध्ये संजय दत्तची सुटका करण्यात आली. पुण्यातल्या येरवडा तुरूंगातल्या चांगल्या वर्तणुकीमुळे ही सूट देण्यात आल्याचे स्पष्टीकरण तुरूंग प्रशासनाकडून देण्यात आले.