‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ हा सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेली प्रतिभा प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. धर्मेश सर आणि अभिनेत्री पूजा सावंत या कार्यक्रमाचं परीक्षण करताहेत.
या कार्यक्रमातील श्वेता टुरकुल हिनं बोन ब्रेकिंग या अजब स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्वेताप्रमाणेच इतर डान्सर्ससुद्धा या कार्यक्रमात आपल्या नृत्याची चुणूक दाखवत आहेत. श्वेता ही मुंबईची असून गेल्या सात आठ वर्षांपासून ती नृत्य करतेय. तिचं शरीर लवचिक असल्यानं ती बोन ब्रेकिंग ही स्टाईल करू शकते. या कार्यक्रमात भाग घेऊन तो जिंकणं हे तिचं स्वप्न आहे. खरं तर स्वप्नापेक्षा जास्त ती तिची गरज आहे.
आणखी वाचा : बिकिनीतील फोटोंवरून ट्रोल करणाऱ्यांवर ‘तारक मेहता..’मधील सोनू भडकली, म्हणाली..
मध्यमवर्गीय कुटुंबातल्या श्वेताच्या कुटुंबीयांचं घर घेताना फसवणूक झाली आणि राहतं घर सोडून त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागलं. त्याच दरम्यान लॉकडाउनची घोषणा झाली आणि घरात येत असलेल्या पैशांचा मार्गही थांबला. घरभाडं आणि घरातला खर्च यांमध्ये श्वेताला आपलं डान्सचं स्वप्न बाजूला ठेवून घरच्यांसाठी उभं राहावं लागलं. ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’मध्ये तिची निवड टॉप १२ मध्ये झाली आहे.
श्वेता टुरकुलच्या तोडीस तोड असलेले इतर अकरा स्पर्धक या स्पर्धेत आहेत. ही लढत आता चुरशीची होणार आहे. ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’चा ग्रँड प्रिमियर १४ आणि १५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 10, 2020 5:00 pm