28 February 2021

News Flash

मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर आणि मराठीचं ‘हे’ कनेक्शन माहित आहे का ?

या चित्रपटातून सार्वजनिक शौचालयांच्या कमतरतेवर भाष्य करण्यात येणार आहे

मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर

स्वच्छता आणि शौचालय हे विषय हाताळत बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटानंतर आता राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा याच विषयावर ‘मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या बॉलिवूड चित्रपटाचं मराठीशी खास नातं आहे.

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अंजली पाटील, मकरंद देशपांडे, अतुल कुलकर्णी, नचिकेत पूर्णापत्रे या मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. या मराठी कलाकारांमुळेच अनेक वेळा चित्रपटाच्या सेटवरील सर्व क्रु मेंबर्सला अनेक वेळा मराठीमोळ्या पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाल्याचंही पाहायला मिळालं.

सर्व कलाकार मराठी असल्याने सेटवर रोज पूर्ण क्रूसाठी महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण असायचे. त्यामुळे क्रूमेंबर्सना रोज विविध प्रकारच्या मराठी पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळाला. विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन जेवणाच्या प्रेमात असलेल्या या साऱ्या लोकांनी एकही दिवस बाहेरुन जेवण मागवलं नाही. त्यामुळे या चित्रपटातील तसंच सेटवरील प्रत्येकाचं मराठीशी आणि महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीशी एक वेगळं नातं निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, या चित्रपटातून सार्वजनिक शौचालयांच्या कमतरतेवर भाष्य करण्यात आलं असून मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. हा चित्रपट येत्या १५ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 6:53 pm

Web Title: maharashtrian food set movie mere pyare prime minister
Next Stories
1 Video : कब्बडीवर आधारित ‘सूर सपाटा’चा ट्रेलर प्रदर्शित
2 या बायोपिकमध्ये श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली एकत्र झळकणार
3 सगळेच प्रचारात व्यस्त तर देशाला वाली कोण?, रिचाने राजकारण्यांना विचारले प्रश्न
Just Now!
X