News Flash

महिप कपूर यांनी शेअर केला मिस इंडिया स्पर्धेचा तो व्हिडीओ, मलायका अरोरा म्हणाली…

नम्राता शिरोडकरेही दिली कमेंट

1993 साली अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिने मिस इंडियाचा किताब जिंकला होता याबद्दल अनेकांना माहित आहे. याच स्पर्धेत अभिनेत्री पूजा बेददेखील सामिल झाली होती. मात्र याच स्पर्धेत आणखी एक तरुणी सामील झाली होती. ही तरुणी अखेरच्या फेरीपर्यंत स्पर्धेत होती. ती म्हणजे अभिनेता संयज कपूर यांनी पत्नी महिप कपूर.

महिप कपूर यांनी 1993 सालच्या मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता शिवाय त्या अंतिम पाच स्पर्धकांमध्ये सामील झाल्या होत्या. बॉलिवूड अभिनेत्याची ग्लॅमरस पत्नी असलेल्या महिप यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. महिप यांनी 1993 सालातील मिस इंडिया स्पर्धेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maheep Kapoor (@maheepkapoor)

या व्हिडीओत महिप यांनी काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केल्याचं दिसतंय. या फेरीत त्यांना, फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना ड्रेसमध्ये काही वळवळल्या सारखं झालं तर काय कराल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी बिनधास्त उत्तर दिलं की, “मी थोडो लटके-झटके देत ते झटकून टाकण्याचा प्रयत्न करेन, माझ्या वॉकवर परिणाम होऊ देणार नाही. मी पुढे चालत राहिन.”

“सलमानने विश्वासघात केला होता म्हणून…; काय म्हणाली सलमानी एक्स गर्लफ्रेण्ड?

महिप कपूर यांनी इन्स्टाग्रामला व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्या म्हणाल्या, ” मिस इंडिया 1993 , फायनलीस्ट. काही काळापूर्वीचं वेगळ आयुष्य.” महिप यांच्या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. नम्रता शिरोडकरने कमेंटमध्ये म्हंटलं आहे. ” आपण दोघींनी स्टेज शेअर केला होता.” तर मलायका अरोरानेदेखील महिप यांच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. “मोहिपसस.. तू अजूनही ते करु शकतेस” अशा आशयाची कमेंट मलायकाने दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maheep Kapoor (@maheepkapoor)

तर महिप आणि संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूरनेदेखील आईच्या व्हिडीओला हार्टचे इमोजी दिले आहेत.
महिप कपूर यांनी 90 च्या दशकात निलम कोठारी, भावना पांडे यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. मात्र त्या फार काळ बॉलिवूडमध्ये टिकल्या नाहित.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 5:16 pm

Web Title: maheep kapoor wife of sanjeev kappor share video of miss india 1993 malaika arora comment kpw 89
टॅग : Bollywood,Entertainment
Next Stories
1 सैफचा मुलगा इब्राहिम अली खान करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री, करण जौहर करणार मदत
2 ‘बस करो भाई क्यूँ इतनी इज्जत दे रहे हो’; करीनाचं वागणं पाहून संतापले नेटकरी
3 महाराष्ट्राच्या लेकींची सुरेल मेजवानी; ‘सूर नवा ध्यास नवा’चं नवं पर्व
Just Now!
X