News Flash

दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूसोबत जान्हवी कपूर करणार काम?

जाणून घ्या सविस्तर

दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत किर्ती सुरेश मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यानंतर महेश बाबू पॅन-इंडिया चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. या चित्रपटात दिवंग्गत अभिनेत्री श्री देवी यांची मुलगी जान्हवी कपूर महेशसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

जान्हवी कपूर दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एण्ट्री करणार या गोष्टीची चर्चा बऱ्याच काळापासून सुरु आहे. टॉलीवूडमधील दिग्दर्शक जान्हवी सोबत काम करण्याचा पुर्ण प्रयत्न करत असताना जान्हवीने टॉलीवूडमध्ये करण जोहर सोबत एण्ट्री करण्याचे ठरवले आहे. महेश बाबूचे वडील कृष्णा आणि जान्हवी कपूरची आई श्री देवी यांनी एकत्र अनेक हीट चित्रप दिले आहेत.

करण जोहर महेश बाबू आणि जान्हवी कपूर यांच्या या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी करण एका नवीन दिग्दर्शकाच्या शोधात आहे असे सांगण्यात येत आहे. तर निर्मात्यांना या चित्रपटाचे चित्रीकरण दोन महिन्यात संपवायचे आहे.

या चित्रपटानंतर महेश बाबू लगेचच एसएस राजामौली यांच्या चित्रपटात दिसणार आहे. बॉलिवूड चित्रपटांसाठी दिगदर्शकांनी बर्‍याच वेळा महेश बाबूला संपर्क केला, पण त्याचे म्हणने होते की तेलगू चित्रपटांमध्येच त्याला काम करायचे आहे. यामुळे त्याने आता पर्यंत बॉलिवूड चित्रपटांना होकार दिला नाही. महेश बाबूच्या अनेक चाहत्यांना त्याला बॉलिवूडमध्ये पाहायची इच्छा आहे. मात्र, ही इच्छा ही इच्छाच राहणार की महेश बाबूला कधी बॉलिवूडमध्ये पाहता येईल हे तोच सांगू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 1:50 pm

Web Title: mahesh babu and janhvi kapoor will share screen together in karan johar film dcp 98
Next Stories
1 नेमप्लेटवर विरुष्कासोबत वामिकाचे नाव
2 पुन्हा ‘scam’, अभिषेकच्या ‘The Big Bull’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
3 बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने केले मराठमोळ्या अक्षय इंडीकरच्या ‘स्थलपुराण’चे कौतुक
Just Now!
X