25 February 2021

News Flash

महेश बाबूच्या मुलीचं लवकरच कलाविश्वात पदार्पण

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू व नम्रता शिरोडकर यांची सात वर्षांची मुलगी सितारा लवकरच कलाविश्वात पदार्पण करणार आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू व नम्रता शिरोडकर यांची सात वर्षांची मुलगी सितारा लवकरच कलाविश्वात पदार्पण करणार आहे. ‘फ्रोझन २’च्या तेलुगू व्हर्जनमधील लहानपणीच्या एल्साला सितारा तिचा आवाज देणार आहे. २०१३ मध्ये ‘फ्रोझन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेल्या या चित्रपटाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने सिताराच्या पदार्पणाची माहिती दिली असून ‘फ्रोझन २’ हा इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात सिताराची आई नम्रता म्हणाली, ”सिताराला ‘फ्रोझन’ हा चित्रपट फार आवडतो आणि त्यातील एल्सा ही भूमिका तिच्या फार जवळची आहे. तिला चित्रपटांची खूप आवड आहे. त्यामुळे एल्साला आवाज देण्याची संधी ती नाकारुच शकत नव्हती. ही संधी सिताराला देण्याबद्दल मी डिस्नेच्या टीमचे आभार मानते.”

पाहा फोटो : ‘३ इडियट्स’मधला मिलिमीटर आता असा दिसतो..

अभिनेत्री श्रुती हसन ही ‘फ्रोझन २’च्या तामिळ व्हर्जनसाठी एल्साला आवाज देणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे श्रुतीने याबाबतची माहिती दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 10:39 am

Web Title: mahesh babu daughter sitara is all set to make her debut in the showbiz ssv 92
Next Stories
1 दीपिका होणार आई? रणवीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
2 ‘हे राम’ वाणी कपूरनं हे काय केलं, सोशल मीडियावर झाली ट्रोल
3 ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या संहितेचे रायगडावर पूजन
Just Now!
X