दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा ‘महर्षी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. वामसी पैदीपल्ली दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या यशानिमित्त महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकर हिने एक सेल्फी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या फोटोत नम्रता मेकअपशिवाय दिसल्याने एका युजरने तिच्यावर टीका केली. या टीकेला न जुमानता नम्रताने त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘महर्षी’ चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी तिने महेश बाबूसोबतचा सेल्फी पोस्ट केला. या सेल्फीवर एका युजरने टीका केली. ‘नम्रता तू थोडं मेकअप का करत नाही? तू नैराश्यग्रस्त आहेस का?,’ असा खोचक सवाल त्या युजरने केला. या कमेंटवर नम्रताने उत्तर दिलं, ‘गौरव तुला मेकअप केलेल्या महिलाच आवडत असतील. तुझ्या निकषांवर जी व्यक्ती योग्य ठरत असेल, जी नेहमीच मेकअप करत असेल अशा लोकांनाच तू फॉलो केलं पाहिजेस. तशी व्यक्ती तुला या पेजवर सापडणार नाही, त्यामुळे तू इथून निघून जा अशी प्रामाणिक विनंती आहे.’
नम्रताने दिलेल्या या उत्तराचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं. सेलिब्रिटींनी नेहमीच मेकअप केलेलं असावं अशी अपेक्षा चाहत्यांनी ठेवू नये अशी कमेंट एकाने केली. तर काहींनी नम्रताच्या साधेपणाची स्तुती केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 12, 2019 11:40 am