23 July 2019

News Flash

Video : आलियाचा बालपणीचा व्हिडिओ शेअर करत महेश भट्ट यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अवघ्या काही मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये आलियाचं गोंडस रुप पाहून अनेकजण तिच्या प्रेमातच पडले आहेत.

आलिया भट्ट

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली आलिया सध्याच्या घडीला बी- टाऊनमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. अभिनयासोबतच निरागस सौंद्याची देणगी लाभलेल्या आलियाच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. असंख्य चाहत्यांच्या या गर्दीत तिच्या वडिलांचा म्हणजेच महेश भट्ट यांचाही समावेश आहे.

आलियाचा प्रचंड अभिमान वाटणाऱ्या महेश भट्ट यांनी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. काही आठवणी काळानुसार बदलत किंवा संपत नाहीत असं त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

अवघ्या काही मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये आलियाचं गोंडस रुप पाहून अनेकजण तिच्या प्रेमातच पडले आहेत. या व्हिडिओतून वडील आणि मुलगी यांच्यात असलेलं सुरेख नातंही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ बऱ्याचजणांनी शेअर करत तो व्हायरल झाल्याचं लक्षात येत आहे.

महेश भट्ट यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ते चिमुकल्या आलियासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं एक गाणं गाताना दिसत आहेत. तर आलियासुद्धा त्यांच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहाताना दिसतेय.

आलिया सध्या ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘कलंक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या दोन चित्रपटांची चर्चा असतानाच तिने नुकतंच ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा चित्रपटसुद्धा साइन केला आहे.

 

First Published on March 15, 2019 11:41 am

Web Title: mahesh bhatt shared alia bhatt childhood video and gave birthday wishes