28 November 2020

News Flash

महेश भट्ट यांच्या वकिलाने फेटाळले लविनाने केलेले आरोप; म्हणाले…

वाचा, नेमकं काय आहे हे प्रकरण?

बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप करणारी लविना लोध सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. लविनाने ट्विटर व इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने महेश भट्ट आणि पती सुमित सभरवाल या दोघांवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनंतर महेश भट्ट यांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, महेश भट्ट यांच्यावर लविनाने केलेले आरोप खोटे आहेत. तिने केलेले आरोप हे खोटे आणि अपमानास्पद आहेत. कायदेशीररित्या हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे महेश भट्ट कायदेशीर सल्ल्यानुसार योग्य ती कारवाई करतील, असं महेश भट्ट यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.

काय आहेत लविनाचे आरोप?

“माझं नाव लविना लोध असून हा व्हिडीओ मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी करत आहे. माझं लग्न महेश भट्टच्या भाच्यासोबत सुमित सभरवालसोबत झालं असून मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सुमित ड्रग्स सप्लाय करतो. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आहेत. यात अमायरा दस्तूर आणि अशा अनेक अभिनेत्रींचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत आणि हे फोटो तो दिग्दर्शकांना दाखवतो. तो कलाविश्वात मुली सप्लाय करतो.या सगळ्याची कल्पना महेश भट्टला आहे. महेश भट्ट या कलाविश्वातला सगळ्या मोठा डॉन आहे”, असं लविना म्हणाली.

हेही वाचा : ‘माझ्या मृत्यूला महेश भट्ट जबाबदार असेल’; व्हिडीओ शेअर करत तिने केले गंभीर आरोप

पुढे ती म्हणते, “ही सगळी इंडस्ट्री तोच चालवतो आणि जर तुमच्याकडून नियमांचं उल्लंघन झालं तर ते तुमचं जगणं कठीण करुन टाकतात. महेश भट्टने अनेकांचे आयुष्य उद्घवस्त केले आहेत. त्यांनी अनेक कलाकार, दिग्दर्शक, कंपोजर्स यांच्याकडून काम काढून घेतली आहेत. ते एक फोन करतात आणि समोरच्याचं काम काढून घेतात. विशेष म्हणजे हे कोणाच्या लक्षातदेखील येत नाही. अशा प्रकारे त्यांनी अनेकांचं आयुष्य़ बर्बाद केलं आहे. त्यांच्याविरुद्ध मी तक्रार दाखल केल्यानंतर ते सातत्याने मला त्रास देत आहेत. मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एकतर मी त्यांच्याविरोधात एनसी करायला गेले तर कोणत्याच पोलीस ठाण्यात एनसी नोंदवून घेतली जात नाही, आणि जर का ती घेतली तर कोणीही त्यावर काहीच कारवाई करत नाही. जर पुढे जाऊन माझ्यासोबत किंवा माझ्या कुटुंबासोबत काही कमी जास्त झालं तर त्याला महेश भट्ट, सुमित सभरवाल, साहिल सेहगल, कुमकुम सेहगल हे जबाबदार असतील”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 9:43 am

Web Title: mahesh bhatts lawyer reacts to luviena lodhs video alleging that the filmmaker is harassing her ssj 93
Next Stories
1 बोल्डनेसमुळे चर्चेत राहणाऱ्या मल्लिकाचं खरं नाव माहित आहे का?
2 ‘माझ्या मृत्यूला महेश भट्ट जबाबदार असेल’; व्हिडीओ शेअर करत तिने केले गंभीर आरोप
3 ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ चित्रपट महोत्सव २६ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस
Just Now!
X