मराठी नाट्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्कार महेश एलकुंचवार यांना सांगलीत प्रदान करण्यात आला. अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समितीच्या वतीने दिला जाणारा हा नाटय़ क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजला जातो.
प्रतिभावंताची पंचाहत्तरी..
५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनानिमित्त झालेल्या विशेष कार्यक्रमात अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते एलकुंचवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विष्णुदास भावे गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख ११ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. टय़क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. एलकुंचवार हे पुरस्कार मिळविणारे ४८ वे कलावंत आहेत. यापूर्वी बालगंधर्व, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, विठाबाई नारायणगावकर, निळू फुले, श्रीमती फैय्याज शेख आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.