29 September 2020

News Flash

Video : भाईंसोबत दिग्गजांच्या मैफिलीत ‘कानडा राजा पंढरीचा’ गजर

'कानडा राजा पंढरी'चा हे गाणं नव्यानं 'भाई : व्यक्ती की वल्ली'मध्ये पाहायला मिळणार आहे.

बहुरंगी, बहुढंगी कलाकार आणि महाराष्ट्राचे लाडके लेखक पु.लं. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘कानडा राजा पंढरी’चा हे गाणं नव्यानं ‘भाई : व्यक्ती की वल्ली’मध्ये पाहायला मिळणार आहे.

भाईंसमवेत कुमार गंधर्व, भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांच्या मैफलीत सुरू झालेला विठ्ठलाचा गजर तितकाच श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आहे. राहुल देशपांडे, जयतीर्थ मेवुंडी, भुवनेश कोमकली यांच्या सुरांची जादू या गाण्यात पाहायला मिळत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता सागर देशमुख पु.लंच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पु.लंच्या जीवनातील अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

महाराष्ट्राला आपल्या लेखणीतून हसवणाऱ्या पु.लं.चं आयुष्य नेमकं कसं होतं हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पूर्वार्ध ४ जानेवारीला तर उत्तरार्ध ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 7:20 pm

Web Title: mahesh manjrekar flim bhaai vyakti kee valli kanada raja pandharicha new song
Next Stories
1 Flashback 2018 : ‘खान’दानावर भारी पडल्या बॉलिवूडच्या या ‘स्त्री’!
2 या दिवशी रंगणार ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनाले
3 ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेत बाळू करणार अघटितावर मात
Just Now!
X