21 September 2020

News Flash

‘भाई’ चित्रपटावरील आरोपांबाबत महेश मांजरेकर म्हणतात..

चित्रपटात बुजुर्ग कलाकारांवर चित्रित करण्यात आलेले प्रसंग हीन दर्जाचे असल्याचं म्हणत त्यावर आक्षेप घेण्यात आला होता.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र पहिल्या भागावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटात गानहिरा हिराबाई बडोदेकर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी या बुजुर्ग कलाकारांवर चित्रित करण्यात आलेले प्रसंग हीन दर्जाचे असल्याचं म्हणत त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. या आरोपांबाबत आता महेश मांजरेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘भाई : व्यक्ती की वल्ली हा चित्रपट डोळ्यात तेल घालून बनवला आहे. यामध्ये पुल असोत किंवा भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर असोत यांचे कुणाचेही विपर्यस्त चित्रण केलेलं नाही. ज्यांनी कुणी आक्षेप घेतले आहेत ती मोठी माणसे आहेत. त्यावर मी काही बोलणार नाही,’ असे मांजरेकर म्हणाले.

वाचा : रिअॅलिटी शो स्पर्धक ते आघाडीची बॉलिवूड गायिका; असा आहे भूमी त्रिवेदीचा यशस्वी प्रवास 

चित्रपटात पु. ल. देशपांडे हे वारंवार दारू सिगारेट पिताना दाखवल्याचीही टीका करण्यात आली होती. त्यावर ते पुढे म्हणाले, ‘जशी सचिनच्या हाती बॅट तशी पुलंच्या हाती सिगारेट असायची. ते चेन स्मोकरच होते.’

८ फेब्रुवारी रोजी ‘भाई : व्यक्ती की वल्ली’चा उत्तरार्ध प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत महेश मांजरेकर यांनी येत्या काळात नामदेव ढसाळ यांच्यावर बायोपिक बनवू अशी माहिती दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 4:55 pm

Web Title: mahesh manjrekar on bhai vyakti ki valli movie controversy
Next Stories
1 रिअॅलिटी शो स्पर्धक ते आघाडीची बॉलिवूड गायिका; असा आहे भूमी त्रिवेदीचा यशस्वी प्रवास
2 रिलेशनशिप थीमवर रंगणार महाराष्ट्राची हास्य जत्रा
3 स्थूलपणावरून कमेंट करणाऱ्यांना नेहा धुपियाचं सडेतोड उत्तर
Just Now!
X