X
X

‘तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन’, महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी

जाणून घ्या काय आहे प्रकरण

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी आपल्या कुटुंबीयांसोबतच गुढीपाडवा हा सण साजरा केला. हा सण साजरा करताना त्यांनी एक कुटुंबासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या या फोटोवर एका ट्रोलरने शिवीगाळ करत कमेंट केली होती. ती कमेंट पाहून महेश मांजरेकरांनी त्या ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे.

महेश मांजरेकर यांनी गुढीपाडवा साजरा करताना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘आम्ही एकत्र आहोत. आज गुढीपाडवा, पण करोनावर विजय मिळवल्यावर आपण सर्वसण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करुया. तोवर घरीच रहा, सुरक्षित रहा आणि कुटुंबासोबत छान वेळ घालवा’ असे कॅप्शन देत लोकांना घरात राहण्याचा संदेश दिला होता.

त्यांच्या या फोटोवर अनेकांनील शुभेच्छांचा वर्षाव केला. पण एका यूजरने मात्र मांजरेकरांच्या संपूर्ण कुटुंबाला शिवीगाळ केली आहे. त्याची ती कमेंट वाचतात महेश मांजरेकर चिडले आणि त्यांनी त्या ट्रोलरला चांगलेच सुनावले.

‘तू ज्या दिवशी मला भेटशील त्या दिवशी तुझे काही खरे नाही. आणि मी तुला लवकरात लवकर शोधून काढेल. करोनामुळे जे सुरु आहे ते सर्व शांत होऊ दे. मी तुला वचन देतो तुला शोधण्यासाठी मी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाईन पण तुला शोधून काढेन’ अशी धमकी महेश मांजरेकरांनी त्या ट्रोलरला दिला

20
X