सोशल मीडियावरील पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिच्यावर जोरदार टीका होत असतानाच आता निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहित तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
vinod patil s meeting with chief minister deputy chie
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी विनोद पाटील यांची चर्चा; छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात उमेदवारी देण्याच्या हालचाली
Nashik Lok Sabha
साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दांत टीका केली. त्यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये तिने महाराजांचा एकेरी उल्लेख केला.

महेश टिळेकर यांनी घेतला खरपूस समाचार

निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत केतकीचा खरपूस समाचार घेतला होता. “जेव्हा महाराष्ट्रात दुसरी मोठी संकटं येतात, मग ती पूरजन्य परिस्थिती असो किंवा मग करोनाचा प्रादुर्भाव अशा वेळी तरुण पिढीच मदतकार्यात सर्वांत पुढे असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनून ते मदत करतात. तेव्हा केतकीने त्यांचं कौतुक केलं का? स्वत: काही केलंय का? त्यामुळे तरुणपिढीला नावं ठेवायचा तिला काय अधिकार आहे”, असा सवाल त्यांनी या व्हिडीओद्वारे केला होता.

सोशल मीडियावर ट्रोलिंगनंतर स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने व्हिडीओ डिलिट करत जाहीर माफी मागितली. मात्र केतकीने अद्याप तिची पोस्ट डिलीट केली नाही किंवा अथवा त्याप्रकरणी माफीदेखील मागितली नाही.