News Flash

डिलीव्हरी रूममधील फोटो शेअर करत, माहीने सांगितला ‘त्या’ क्षणाचा अनुभव

जाणून घ्या काय म्हणाली माही...

अभिनेता आणि सूत्रसंचालक जय भानुषालीची पत्नी आणि अभिनेत्री माहीने दीड वर्षांपूर्वी मुलगी ताराला जन्म दिला होता. त्या क्षणाला पुन्हा एकदा जीवंत करण्यासाठी माहीने तिचा डिलीव्हरी रूममधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तर प्रचंड व्हायरल झाला आहे.

माहीने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोमध्ये माही बेडवर झोपली आहे. जय तिच्या बाजूला असून त्यांच्या दोघांमध्ये तारा आहे. हा फोटो शेअर करत माहीने बाळाला जन्म देतनाचा अनुभव तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. बाळाला जन्म देणं फार कठीण असल्याचं माही याठिकाणी म्हटली आहे. “बाळाला जन्म देणं ही सोपी गोष्टी नाही. सर्वात कठीण गोष्ट म्हणजे, सी-सेक्शन होतं आणि आपल्याला बाळाचे पालनपोषण करावे लागते. एक म्हणजे आपले टाके आणि त्यात भर म्हणजे शरीराची वेदना कारण ती सामान्य प्रसूतीपेक्षा वेगळी असते,”असे माही म्हणाली.

ती पुढे म्हणाली,”पण मला वाटते की आयुष्यात जे काही घडते ते आपल्याला आणखी मजबूत बनवते. सगळ्यांना माहित आहे की स्त्रीयांपेक्षा जास्त बलवान कोणी नाही. मात्र, जेव्हा आपण आपल्या बाळाला पाहतो तेव्हा या सगळ्या वेदना नाहीशा होतात,”अशा आशयाचे कॅप्शन देत माहीने ताराला जन्म दिल्याचा अनुभव सांगितला आहे.

माही आणि जय यांनी २०१०साली लग्न केले. लग्न झाल्यानंतर ९ वर्षांनी माहीने ताराला जन्म दिला. २१ ऑगस्ट २०१९ साली ताराचा जन्म झाला. या आधी त्यांनी दोन मुलांना दत्तक घेतले आहे. हे जय आणि माही सोशल मीडियावर ताराचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 5:07 pm

Web Title: mahhi delivery room photo goes viral the experience of giving birth dcp 98
Next Stories
1 सोशल मीडियावर ‘महारानी’चा धुमाकूळ; हुमा कुरेशीच्या लूकला चाहत्यांची पसंती
2 आईच्या पावलांवर पाऊल, तैमूरचा योगा पाहून करीना म्हणाली…
3 पुरस्कार सोहळ्यात तापसीने केली कंगनाची स्तुती, कंगना म्हणाली…
Just Now!
X